“विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल”
पंढरीला जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेणे हे चांगलेच* पण ….
अखंड नामाचा उच्चार करून “देहाची पंढरी” करणे हे त्याहून चांगले.

नामजप किंवा नामस्मरण करण्यासाठी* काळाची, वेळेची किंवा स्थळाची बंधने नाहीत. *नामस्मरणाला वर्ण, धर्म, जात, कुळ किंवा वंश यांचीही बंधने नाहीत.* त्याचप्रमाणे श्रीमंत व गरीब, अव्यंग वा अपंग किंवा साक्षर वा निरक्षर अशा कुठल्याही प्रकारच्या माणसांना नामस्मरण करण्यास आडकाठी येत नाही.
थोडक्यात, नामस्मरणाचा अधिकार यच्चयावत सर्व माणसांना संतांनी बहाल केलेला आहे.

”नाम” हा संतांनी लावलेला एक फार मोठा शोध आहे;* परंतु लोकांना या सत्याचा बोध झालेला दिसत नाही. तुकाराम महाराजांनी नाम हा संतांचा एक मोठा शोध आहे याचे सुंदर रीतीने वर्णन केलेले आहे, ते सांगतात-

*संत एकांती बैसले।*
*सर्वही सिद्धांत शोधिले।।*
*ज्ञानदृष्टी अवलोकिले।*
*सार काढिले निवडोनि।।*
*ते हे श्रीहरिचे नाम।*
*सर्व पातकां करी भस्म।।*
*अधिकारी उत्तम आणि अधम।*
*चारि वर्ण नरनारी।।*

वेदांचा अधिकार फक्त तीन वर्णांनाच आहे, तर नामाचा अधिकार चारही वर्णाना व स्त्रियांना आहे.* माणसे सुष्ट असोत किंवा दुष्ट असोत, उत्तम असोत किंवा अधम असोत, सज्जन असोत किंवा दुर्जन असोत, नामाचा अधिकार या सर्वांनाच आहे.

असे हे नाम *संतांनी एकांतात बसून, सर्व सिद्धांतांचा अभ्यास करून, खोल ज्ञानदृष्टीने शोधून काढले व सर्व जनांना कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता उपलब्ध करून दिले.*

*覆 नामस्मरणाचा अधिकार संतांनी सर्वांना जसा उपलब्ध करून दिलेला आहे, त्याप्रमाणे नामाचा महिमा संतांनी स्पष्ट शब्दांत सांगितलेला आहे.* हरिपाठात व अन्यत्र ज्ञानेश्वर महाराजांनी नामाचा महिमा अभंगातून विशद केलेला आहे, तो असा —

*✡️ नामस्मरणाने शारीरिक व मानसिक रोग दूर होतात.*

*✡️ नामस्मरणाने संकटे व विघ्ने नाहीशी होतात.*

*✡️ नामस्मरणाने सुखसमाधान प्राप्त होते.*

*✡️ नामस्मरणाने अगणित पुण्याची प्राप्ती होते.*

*✡️ प्रत्यक्ष परमेश्वर नामस्मरण करणाऱ्यांना अनुकूल होतो.*

*✡️ वेदशास्त्रांचे प्रणेते ऋषीमुनी नामस्मरण करणाऱ्यांना हात उभारून आशीर्वाद देतात.*

*✡️ नामस्मरणाने चारही मुक्ती प्राप्त होतात.*

* असे हे हरिनाम स्थूल दृष्टीने एक ध्वनी आहे, सूक्ष्म दृष्टीने पाहता तो एक दिव्य विचार आहे व अती सूक्ष्म दृष्टीने न्याहाळता ते एक तत्त्व आहे.* या तीनही दृष्टिकोनांतून नामाचा महिमा संतांनी सांगितलेला आहे व ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठातून गायलेला आहे.

✅ नामाचा उच्चार करण्यात किंवा घोष करण्यात किंवा संकीर्तन करण्यात ध्वनी निर्माण होतो व *त्या ध्वनीमुळे वातावरणात लहरी (Vibrations) निर्माण होतात.* नामघोष करण्यात नामधारकाचा हरिनामासंबंधी जो शुद्ध भाव असतो *त्या शुद्ध भावाच्या प्रभावामुळे वातावरणात शुद्ध लहरी निर्माण होतात व त्या शुद्ध लहरी वातावरणनिर्मिती करण्यास कारणीभूत ठरतात.*
हे लक्षात घेऊन ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत सांगतात-
*असे माझेनी नामघोषे।*
*नाहीशी करीती विश्वाची दुःखे।।*
*अवघे जगची महासुखे।*
*दुमदुमीत भरले।।*
थोडक्यात, … 
 हरिनामाच्या उच्चाराने *वातावरणात शुद्ध लहरी निर्माण होऊन अखिल विश्वात पसरतात, वातावरण-शुद्धी करतात व विश्वाला उपकारक ठरतात.*

      *– सद्गुरू श्री वामनराव पै*
*अध्यात्माला माणसाच्या जवळ आणणारा,*
                    *”मार्गदर्शक”.*
              ✍️ स. प्र. (sp)1289

error: Content is protected !!