सोमाटणे:
मावळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने दारुंब्रे येथे प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले.

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे,भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे,भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे,मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख तथा मावळ भाजपा अध्यक्ष रविंद्र भेगडे प्रमुख उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी सिंकर राजस्थान येथील शेतकरी मेळाव्यातून ऑनलाईन पद्धतीने देशभरातील सर्व “प्रधानमंत्री कृषी समृध्दी केंद्र” चे उद्घाटन करून शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले व प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा १४  वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला.

हा कार्यक्रम दारुंब्रे येथे शेतकरी बांधव,भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ऑनलाईन सहभागी होऊन पंतप्रधान मोदी यांचे मार्गदर्शन ऐकले.

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक शामराव राक्षे,मावळ भाजपा संघटक  किरण  राक्षे,युवा मोर्चा कार्याध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, दारुंब्रे विकास सोसायटी चेअरमन यादव सोरटे, साळुंब्रे विकास सोसायटी चेअरमन सतीश राक्षे, सांगवडे ग्रामपंचायत सरपंच रोहन जगताप,गोडुंब्रे ग्रामपंचायत सरपंच निशा गणेश सावंत,दारुंब्रे विकास सोसायटी व्हा.चेअरमन राजाराम जाधव,साळुंब्रे विकास सोसायटी व्हा.चेअरमन कलावती किसन आमले, सांगवडे गावचे उपसरपंच  योगेश राक्षे यांच्यासह गावातील शेतकरी बांधव व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!