वडगाव मावळ: मावळ तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे.त्यामुळे ओढे नाले दुथडी भरून वाहत आहे.आंद्रा,पवना,इंद्रायणी नदीच्या पाणीपात्रात मोठी वाढ झाली आहे.तर आंद्रा,जाधववाडी,ठोकळवाडी,शिरोता,सोमवडी,वाडिवळे,पवनासह अन्य धरणातील पाणीसाठा वाढू लागला आहे.
आंदर मावळ,नाणे मावळ,पवन मावळातील सह्याद्रीच्या कडेपठारावरील धबधबे वाहू लागले आहे.
भात खाचरात पाणी वाढल्याने भात लावणीच्या कामाचा वेग मंदावला आहे. वातावरणात गारवा वाढल्याने वयस्कर मंडळी शेकोटीचा आधार घेत आहे.
मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग,खेड्या पाडयांना जोडणा-या रस्त्यावरून पाणी वाहू लागले आहे.वीज पुरवठा वारंवार खंडीत होत आहे.तर निसर्गाचे रौद्ररूप मावळकर अनुभवत आहे.पावसाच्या चर्चा होत आहे.ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी द्यावी अशी मागणी होत आहे.काही ठिकाणी झाडे झुडपे उन्मळून पडली आहेत.
- विकासकामे केली म्हणता, मग पैसे, साड्या का वाटता?
- देहूगावात विकासाच्या जोरावर सुनील शेळके यांच्या प्रचारासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी
- आमदार सुनील शेळके यांना मोदींचा आशीर्वाद ‘विजयी भव’!
- समर्थ विद्यालयात तब्बल ४२ वर्षांनी भरला इ.१०वीचा वर्ग देश विदेशातून विद्यार्थ्यांची हजेरी
- औद्योगिक नगरीत मतदार जनजागृती अभियान