लोणावळा:येथील व्ही.पी.एस इंग्लिश टिचींग स्कूल मध्ये पालखी सोहळा उत्साहात निघाला.विद्या प्रसारिणी सभा,पुणे येथील व्ही.पी.एस इंग्लिश टिचींग स्कूल,लोणावळा मध्ये आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेत रिंगण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
एरवी शाळेच्या गणवेशात असलेले विद्यार्थी यावेळी वारकऱ्यांच्या वेशभूषेत हातात भगवे झेंडे आणि वृंदावन घेऊन आले होते.सुरवातीला विठ्ठलाची आरती,भजन,अभंग असे कार्यक्रम व त्यानंतर रिंगण घातले गेले.
टाळ मृदुंग हाती घेतलेल्या विद्यार्थ्यांनी फुगडी खेळून व नृत्य करून भक्तिमय वातावरण प्रशालेच्या प्रांगणात निर्माण केले.कार्यक्रमाची सांगता सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊ वाटप करून करण्यात आली.
या पालखी सोहळ्याचे नियोजन मुख्याध्यापिका भारती लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.सूत्रसंचालन महादेव शिरसाठ यांनी केले.तसेच शिक्षक शिक्षकेतर यांनी या पालखी सोहळ्यासाठी सहकार्य केले.
संस्थेच्या अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे ,कार्यवाह डॉ.सतीश गवळी ,सहकार्यवाह विजय भुरके यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.