प्रभाचीवाडी येथे श्री राम जन्मोत्सव साजराप्रभाचीवाडी येथील श्री राम मंदिराला १४१ वर्षचा इतिहास

पवनानगर:

मावळ तालुक्यातील पवनमावळ भागातील साठ कुंटुबांची वाडी असलेल्या प्रभाचीवाडी येथील श्री राम मंदिराला १४१ वर्षे पूर्ण झाली आहे.प्रभाचीवाडी येथील राममंदिरही भक्तांनी गर्दी केली होती.

या राममंदिरातही भजन-किर्तनाचा भक्तांनी आनंद लुटला.मावळ तालुक्यातील राममंदिरही भक्तांनी गजबजले होते.बारा वाजता श्री रामचंद्रांना पाळण्यात टाकून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ठिकठिकाणच्या मंदिरात भाविकांनी  मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

यावेळी प्रभाचीवाडी येथे पवनमावळ परिसरातील गावातील मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शनासाठी सकाळपासुनच  रागा लावल्या होत्या.मावळ तालुक्यातील भडवली गावामध्ये एक पुरोहित रिजबुड कुंटब व्यस्तव्या साठी होते.त्यानंतर सन १८८३ साली महागांव येथील प्रभाचीवाडी येथे रिजबुड कुंटुब स्थलांतरीत झाले.

 त्यावेळी सन १८८३ साली कै.त्र्यंबक महादेव रिजबुड यांनी काळ्या पाशानाच्या श्री रामाच्या मुर्तीची स्थापना केल्या आहेत.१९७१ साली प्रभाचीवाडी ग्रामस्थांनी मंदिराची भव्यदिव्य अशी उभारणी केली. त्यावेळी रिजबुड कुटुंबातील कै.जर्नाधन बळवंत रिजबुड यांनी जयपुर येथुन संगमरवरी दगडाच्या मुर्ती घेऊन आले.

यावेळी १९७१ साली प्रभाचीवाडी येथील सार्वजनिक समितीच्या मार्फत मुर्तीची स्थापना केली. यापासुन दरवर्षी राम जन्मोत्सव निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जात असतात.यामध्ये पवनमावळ परिसरातील हजारो भाविक याठिकाणी दर्शनासाठी येत असतात.स्थापनेपासून रिजबुड कुंटुब व प्रभाचीवाडी ग्रामस्थ हे नित्यनेमाने पुजा आरती करत असतात.

यामध्ये रिजबुड कुटुंबातील चौथी पिढी व ग्रामस्थ मंदिराची देखभाल करत आहेत.सन २००८ रोजी प्रभाचीवाडी ग्रामस्थ यांच्या सहकार्याने मंदिराची भव्यदिव्य अशी पुन्हा उभारणी केली आहे.श्री राम जन्मोत्सव सोहळ्या निमित्त प्रभाचीवाडी येथे तीन दिवस अंखड हरिनाम सप्ताह, महाआरती, महाप्रसाद आयोजित केला होता.

श्रीराम जन्मोत्सव निमित्त दि.१७ एप्रिल रोजी सकाळी ७ ते ९ श्री रामास महाअभिषेक सकाळी १० ते १२ ह.भ.प.श्रीहरी महाराज खेडकर यांचे काल्याच्या किर्तनाने सांगता करण्यात आली आहे.तर रात्री मनोरंजन चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. असे पुजारी उन्मेष रिजबुड व प्रभाचीवाडी ग्रामस्थांनी सांगितले आहे.

You missed

error: Content is protected !!