वडगाव मावळ:श्रीराम नवमी चे औचित्य साधून वडगाव कातवीतील सुमारे ५००० ग्रामस्थांना श्रीक्षेत्र अयोध्या येथील रामलल्लाच्या दर्शनाचे मोरया प्रतिष्ठान च्या वतीने टप्प्याटप्प्याने आयोजन केले आहे.रामनवमीच्या शुभमुहूर्तावर ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरात महाअभिषेक करून मोफत अयोध्या दर्शन नावनोंदणीचा शुभारंभ करण्यात आला.

“चलो अयोध्या” चा संकल्पही  करण्यात आला. येत्या जून महिन्यात वडगाव – कातवीतील हजारों रहिवाशांना घेऊन अयोध्येला प्रस्थान करण्यात येणार आहे.

पुणे ते अयोध्या दर्शन परत अयोध्या ते पुणे (संपूर्ण रेल्वे गाडी बुकिंग), प्रवासा दरम्यान सर्व नागरिकांना नाष्टा, जेवन, चहा, पाणी, ओळखपत्र इत्यादी सुविधा मोरया प्रतिष्ठानच्या वतीने मोफत पुरविण्यात येणार आहे अशी माहिती मा नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी दिली.

अयोध्येतील प्रभू श्री रामचंद्रांच्या दर्शनाला जाण्यासाठी नावनोंदणी करण्याकरीता माजी  नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या निवासस्थाना जवळील मोरया प्रतिष्ठान जनसंपर्क कार्यालयात स्वता उपस्थित राहून दोन फोटो व आधारकार्ड झेरॉक्स जमा करून नावनोंदणी करावी असे आवाहन मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली  ढोरे नागरिकांना केले आहे.

You missed

error: Content is protected !!