देवघर जुगार अड्ड्यावर धडक कारवाई
एक लाखांचा मुद्देमाल जप्त:नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल
प्रतिनिधी श्रावणी कामत
लोणावळा:
उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे.
कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली होती की , लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे देवघर येथे अवैधरित्या जुगार अड्डा सुरू आहे व त्यामुळे परिसरातील तरुण युवकांवर चुकीचे परिणाम होत आहेत. त्यावरून सहा.पोलीस अधीक्षक कार्तीक यांनी  पथकाला मिळालेल्या बातमीचे ठिकाणी पाठवले.
   मौजे देवघर येथील वेताळबाबा टेकडीवर एका झाडाखाली मोकळ्या जागेवर पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये इसम नामे अंकुश लक्ष्मण देशमुख वय ३५ वर्ष, रा.देवघर, ता. मावळ,जि पुणे ,सुशील धोंडिबा धनकवडे, वय ६५ वर्ष रा. तुंगार्ली ,लोणावळा,तालुका मावळ जिल्हा पुणे ,मारुती भैरू देशमुख वय ६८ वर्ष, रा देवघर ता.मावळ जि.पुणे, मोहन गबळाजी येवले वय ६० वर्ष, रा वाकसई, ता.मावळ, जि पुणे, ,काळूराम  देशमुख, वय ६८ वर्ष, रा.देवघर,
रमेश मारुती रोकडे वय ५९ वर्ष, रा.देवघर, दिलीप पद्माकर देशमुख, वय ४६ वर्ष, राहणार.देवघर, तालुका मावळ जिल्हा पुणे हे पैशांवर तीन पत्ति नावाचा जुगार खेळताना मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यातून रोख रक्कमेसह एकूण रु.94,400/- (अक्षरी चौऱ्यानौ हजार चारशे रु.) एवढ्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तसेच नमूद कारवाई वेळी पोलिसांची चाहूल लागताच इसम नामे अशोक रोकडे, राहणार देवघर, तालुका मावळ जिल्हा पुणे, व चंदू मडके, राहणार वाकसई, तालुका मावळ, जिल्हा पुणे हे झाडीझुडपांचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले आहेत. सदरबाबत पो.कॉ सुभाष शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गु.र.न
७८/२४ महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम चे कलम १२(अ) अन्वये नमूद नऊ जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक  पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा.पोलीस अधीक्षक  सत्यसाई कार्तिक, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दर्शन दुगड, सपोनि सचिन राऊळ, पोसई शुभम चव्हाण, पो.हवा नितेश (बंटी) कवडे, पो.हवा अंकुश नायकुडे पो.कॉ सुभाष शिंदे, पो.कॉ गणेश येळवंडे, पो.कॉ राहीस मुलानी, पो कॉ. वाळके यांचे पथकाने केली आहे.

error: Content is protected !!