

आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड – एसआयटी स्थापन : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधानसभेत घोषणा
मुंबई, ४ जुलै – पिंपरी चिंचवडमध्ये एका भयानक कटाचा पर्दाफाश झाला असून मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या संभाव्य हत्येचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. यासंदर्भात आमदार शेळके यांनी महाराष्ट्र विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडत गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या या सूचनेला उत्तर देताना गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास…

‘ एक पेड मॉ के नाम ‘ मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात वृक्षारोपण
तळेगाव दाभाडे :’ एक पेड मॉ के नाम ” या शासनाच्या उपक्रमांतर्गत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात वृक्षारोपण करून स्वच्छता अभियान राबविले.सहाय्यक निबंधक कार्यालय सहकारी संस्था, मावळ व बाजार समितीच्या वतीने हा उपक्रम झाला. सहाय्यक निबंधक सर्जेराव कांदळकर, बाजार समितीचे उपसभापती नामदेव शेलार, संचालक दिलीप ढोरे, नथुराम वाघमारे, बंडू घोजगे, बाळासाहेब वाजे,सहकार अधिकारी मंदार…

तळेगाव जनरल हॉस्पिटल तर्फे कै. कृष्णराव भेगडे यांना श्रद्धांजली
तळेगाव जनरल हॉस्पिटल तर्फे कै. कृष्णराव भेगडे यांना श्रद्धांजलीतळेगाव स्टेशन : माजी आमदार कै. कृष्णराव भेगडे यांना तळेगाव जनरल- हॉस्पिटल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.संस्थेचे अध्यक्ष गणेश खांडगे ,चेअरमन शैलेश शहा,नर्सिंग स्कूल चे पालक डॉ.शाळीग्राम भंडारी संस्थेचे संचालक सुखेंदू कुलकर्णी ,डॉ.किरण देशमुख, स्कूलच्या प्राचार्य मोनालिसा पारगे यांच्या सह सर्व शिक्षक वृंद आणि नर्सिंग स्कूलच्या सर्व…

कै.कृष्णराव भेगडे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी शनिवारी तळेगावात शोकसभा
तळेगाव दाभाडे: पुणे जिल्ह्याचे नेते,मावळचे माजी आमदार ,शिक्षणमहर्षी कृष्णराव धोंडीबा भेगडे पंचत्वात विलीन झाले. त्यांच्या स्मृती मावळकरांच्या मनात कायमच घर करून राहणा-या आहे.त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी शनिवारी तळेगावात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. मावळातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक बदलाचे साक्षीदार असलेल्या कै. कृष्णराव भेगडे यांच्या अनेक आठवणीनी मावळकरांच्या मनात आहे. त्या व्यक्त करण्यासाठी ही शोकसभा आहे….

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घेतली स्व. कृष्णराव भेगडे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घेतली स्व. कृष्णराव भेगडे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट तळेगाव दाभाडे: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांनी आज, गुरुवारी (दि. ३ जुलै) तळेगाव दाभाडे येथे भेगडे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतले. मावळचे माजी आमदार, मावळभूषण कृष्णराव भेगडे यांचे सोमवारी (दि. 30 जुन) रोजी दुःखद…