वडगाव मावळ:
शेतकर्‍यांनी कृषी विषयक योजनांचा लाभ घ्यावा,असे आवाहन कृषी सहाय्यक एस.एन.गडग यांनी केले.
मोहितेवाडी(साते) येथे तालुका कृषि अधिकारी मावळ व मंडळ कृषि अधिकारी खडकाळा यांचे मार्गदर्शनाखाली  शेतकर्‍यांना विविध कृषी विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली, यावेळी गडग बोलत होते.

       मोहितेवाडी येथील संकट मोचन हनुमान मंदिरामध्ये आयोजीत चर्चासञामध्ये एस.एन.गडग कृषी सहाय्यक यांनी प्रधानमंञी  पिक विमा योजना,फळबाग लागवड योजना,प्रधानमंञी सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजना,महाडिबिटी कृषी यंञ व औजारे योजना,पी.एम.किसान योजना इत्यादी विविध कृषी योजनांची माहिती तसेच सुधारीत भात लागवड पध्दती बाबत मार्गदर्शन केले.
      
या चर्चासञास शेतकरी प्रदिप शिवाजी मोहिते.व्हा.चेअरमन कान्हे वि.सोसायटी,(माजी सैनिक) झुंबर उभे,(मा.ग्रा.पं.सदस्य), प्रकाश घोंगे,शंकर काळोखे, गंगाराम मोहिते, हिरामण मोहिते,काशिनाथ खानेकर, संभाजी मोहिते,आबाजी मोहिते,पांडुरंग बोलाडे, संतोष खानेकर,राजेश मोहिते, संतोष मांडेकर,रामदास काळोखे, भाऊ खानेकर ,नंदकुमार मोहिते,विनायक खानेकर,शंकर निम्हण,प्रसाद मोहिते,तुकाराम मोहिते,या वेळी उपस्थित होते.

error: Content is protected !!