कृषी केंद्रांवर बियाणे खते खरेदी   साठी शेतक-यांची  गर्दी
चांदखेड :
खरीप हंगामात उशीरा सुरुवात झालेला पाऊस यामुळे मावळ तालुक्यात बहुतेक पेरण्या रखडल्या होत्या परंतु जुन महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात पाऊसांने सुरुवात केली व शेतक-यांची चिंता मिटली. पेरणी योग्य पाऊस झाल्याने सध्या शेतक-यांची बियाणे,खते,तणनाशक,खरेदीसाठी कृषी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.

मावळ तालुका हा भाताचे आगार समजला जातो.भाताबरोबर पुर्व भागातील शेतकरी सोयाबीन,भुईमूग व इतर कडधान्याची लागवड मोठ्या प्रमाणात करत आहेत.कृषी विभागाच्या अंदाजानुसार भात ह्या पिकाची तालुक्यात १३हजार हेक्टरवर लागवड होणार असून सोयाबीन व इतर पिकांची सुमारे५५० हेक्टरवर लागवड होणार आहे.

पाऊस योग्य त्या प्रमाणात पडत असल्याने भाताच्या रोपांसाठी खते व तणनाशके तसेच सोयाबीन व इतर कडधान्य पिकांचे बियाणे व खते याची शेतक-यांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे.कृषी विभागाकडून करण्यात आलेल्या खताच्या बॅपर स्टॉकमुळे शेतक-यांना खताची टंचाई जाणवत दिसत नाही.

रामदास गराडे ( कृषी केंद्र चालक परंदवडी) म्हणाले,”  पाऊसाला उशीर सुरुवात झाल्याने सुरुवातीला शेतक-यांनी कृषी निविष्ठा खरेदीकडे पाठ फिरवली होती परंतु आता पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकरी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात कृषी निविष्ठांची खरेदी करण्यात येत आहे. फोटो :- मावळ तालुक्यात पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकरी वर्गाकडून कृषी निविष्ठा खरेदीसाठी कृषी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसुन येत आहे.

शशिकांत वाजे( शेतकरी पुसाणे) म्हणाले,”पाऊस उशिरा सुरु झाल्यामुळे पेरणी रखडली होती आता पेरणी योग्य पाऊस पडल्याने पेरणीसाठी बियाणे,खते व भातारोपांमधील तणासांठी तणनाशकाची खरेदी केली आहे.

error: Content is protected !!