टाकवे बुद्रुक:निगडे मावळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी भगवान शंकर ठाकर यांची बिनविरोध निवड झाली. येथील मावळते उपसरपंच  गणेश मारुती भांगरे यांनी आपल्या सहकार्यांना उपसरपंच पदाची संधी मिळावी या हेतूने आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला.

ग्रामपंचायत कार्यालयात अध्यासी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सरपंच भिकाजी भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणूकित भगवान शंकर ठाकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. निर्धारित वेळेत  ठाकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी तथा सरपंच भिकाजी भागवत यांनी जाहीर केले. 

सहाय्यक म्हणून ग्रामसेवक शशीकिरण जाधव यांनी काम पाहिले. यावेळी उपसरपंच गणेश भांगरे, सदस्य मंगल भागवत, भागाबाई ठाकर, चंद्रकांत करपे,संदीप चव्हाण, रोशनी साळवे, मनिषा लोटे आदी उपस्थित होते. आदिवासी समाजासाठी विविध योजना व विकासकामे तसेच गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे विद्यमान उपसरपंच  भगवान ठाकर यांनी सांगितले.

error: Content is protected !!