वडगाव मावळ:
मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस,भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आर पी आय,(A),एस आर पी ,मनसे,रासप व इतर घटक पक्षाच्या महायुतीचे लोकप्रिय अधिकृत उमेदवार महाससंदरत्न खासदार श्रीरंग बारणे यांचा मंगळवार दिनांक २३/४/२०२४ रोजी मावळ तालुका दौरा आहे.या दौऱ्यात सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी सहभागी व्हावे असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.उमेदवार बारणे हे सकाळी ९ वाजता वडगाव मावळ येथून दौ-याला प्रारंभ करणार आहे. १०.३० वाजता कान्हे,११.४५ ला कामशेत,१२.४५ ला कार्ला परिसर,३वाजता लोणावळा व सायंकाळी ६ वाजता तळेगाव दाभाडे असा दौरा असणार आहे.या दौऱ्यात बारणे या परिसरातील प्रमुख नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते,मतदार यांच्याशी संवाद साधणार आहे. या दौऱ्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
- मी ४१५८ कोटींचा विकास निधी तालुक्यासाठी आणला, तुम्ही ८००० कोटींचा शब्द तरी द्या – सुनिल शेळके
- माजी उपसरपंच रोहीदास असवले यांच्या पुढाकाराने टाकवे बुद्रुकला बैलगाडा घाटात ‘स्टेज’
- विकासकामे केली म्हणता, मग पैसे, साड्या का वाटता?
- देहूगावात विकासाच्या जोरावर सुनील शेळके यांच्या प्रचारासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी
- आमदार सुनील शेळके यांना मोदींचा आशीर्वाद ‘विजयी भव’!