बैलगाडा छकडी संघटनेच्या अध्यक्षपदी विजय टाकवे कार्याधक्षपदी सुरेश गायकवाड ;सचिव नवनाथ शेटे
कामशेत: मावळ-मुळशी-हवेली तालुका बैलगाडा छकडी संघटनेच्या अध्यक्षपदी करंजगावचे विजय शिवाजी टाकवे यांची बिनविरोध निवड झाली.
बैलगाडा मालक संघटनेच्या बैठकीत ही बिनविरोध निवड करण्यात आली.तसेच बैलगाडा छकडी संघटनेच्या कार्याधक्षपदी सुरेश गायकवाड व संदीप आंद्रे तर सचिवपदी नवनाथ शेटे, सह-सचिव रंगनाथ सावंत यांची निवड करण्यात आली. संघटनेच्या कार्यकारणीमधे उपाधक्ष पदी देवराम गायकवाड,नवनाथ पडवळ,प्रविण घरदाळे व सनी हुलावळे तर खजिनदार स्वप्निल तरस व सचिन काजळे यांची सह-खजिनदार म्हणून नेमणूक करण्यात आली.
संघटनेच्या माध्यमातून बैलगाडा शर्यतीला पारंपारिकता जपत डिजिटल संकल्पनेतून ग्लोबल रुप देण्याचा संकल्प संघटनेचा वतीने संकल्प करण्यात आला.
- लोणावळ्यातील दाऊदी बोहरा समाजाने सर्व केला मिलाद-उन-नबी (SA) साजरा
- वातावरणातील बदलानुसार भात पिकावरील कीड रोग व्यवस्थापन करा
- जपान आस्थापन सदस्यांची चैतन्य इंटरनॅशनल स्कूलला सदिच्छा भेट
- कार्ल्यात रंगला लेकी मागण्याचा पारंपरिक खेळ
- कार्ला परिसरात गौरी व गणरायाला भावपूर्ण निरोप गणपती बप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या जयघोष