तळेगाव दाभाडे: राष्ट्रसंत भगवान बाबा यांची जयंती येथे उत्साहात साजरी करण्यात आली. संत भगवान बाबा यांचा जन्म १८८६ चा असून आपल्या जीवनातील सर्वच दिवस त्यांनी वारकरी संप्रदाय वाढविणे, शाकाहार उत्तम आहार,ऊसतोड समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.”एक एकर विका,पण मुले शिकवा” हा उपदेश दिल्यामुळे आज सर्वच घरागारात शिक्षणामुळे सर्वच सुखी झाले
१९६५ नंतर तेजस्वी रूपाने ह.भ.प भीमसिह बाबा यांनी सर्व समाजहित साधत भगवान गडाच्या गादीचा सांभाळ केला.भीमसिह बाबा नंतर महंत नामदेव शास्त्री यांनी गडाला देशाच्या कानाकोपऱ्यात भगवान बाबा यांचे विचार पेरले, गडाची उंची,विचार, ज्ञानेश्वररी चिंतन यामुळे गड आज नावारूपाला आला.
सध्या यु.पी.एस.सी. व एम.पी एस.सी.सराव वर्ग सुरू करून बरेच मुले शिक्षण पूर्ण करत आहेत.गोरगरिबांच्या मुलांसाठी खरवंडी, जांब,खांबे लिंबे येथे १२ पर्यंत शाळा सुरू आहेत.सध्या जागतिक दर्जाचे भव्य असे संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर काम चालू आहे.असे अनेक भाविक भक्तांनी भगवान बाबा यांच्या जन्मामुळे आपले जीवन सार्थक झाले असे विचार मांडले. कार्यक्रमाचे आयोजन संत भगवान बाबा विचारमंच मावळ चे अध्यक्ष अशोक कराड यांनी केले.खाडे, वायबसे, भगवान बडे ,नागरगोजे , राख , ईप्पार ,जायभाये , जवरे, दहिफळे यांनी नियोजन केलेसर्वांना आपले विचार व बाबांना वंदन करण्याची मोलाची संधी मिळाली.
- इंदोरीच्या चैतन्य इंटरनॅशनल स्कूलची विज्ञान आश्रमात शैक्षणिक सहल
- शिरगावात दहा फुटी अजगराला जीवदान:वन्यजीव रक्षक संस्थेचा पुढाकार
- टाटा उद्योगसमूह राष्ट्रप्रेमी: पद्मश्री पोपटराव पवार
- माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा :रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेत भरला पुन्हा वर्ग
- नाणोली तर्फे चाकण येथे रक्तदान शिबीराचे आयोजन