

वडगाव मावळ: मावळ तालुक्याच्या दुर्गम भागातील डोंगरवाडी ते सटवाईवाडी या रस्त्याचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी सटवाईवाडीच्या लाडक्या बहिणींनी मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या कडे केली आहे. या रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने सटवाईवाडीकरांना पायपीट करीत सहयाद्रीच्या पठारावरून खाली यावे लागत असल्याचे येथील महिलांनी आमदार शेळके यांच्या निदर्शनास आणून दिले. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या रक्षाबंधन कार्यक्रमात सटवाईवाडीच्या महिलांनी आपली कैफियत आमदार शेळके यांच्याकडे मांडली. या आशयाचे लेखी निवेदन देऊन गावकऱ्यांना होणाऱ्या त्रासाकडे या सुवासिनींनी लक्ष वेधले रुग्ण, वयोवृद्ध गावकरी यांना झोळीत टाकून आणावे लागते. विद्यार्थी पायपीट करीत ये जा करीत असल्याचे महिलांनी सांगितले.
- लोककल्याणकारी कार्यातून स्वराज्याची उभारणी – श्रीकांत चौगुले
- घराघरांत जिजाऊ निर्माण झाल्या पाहिजेत – सोनाली कुलकर्णी
- शब्दरंगच्या सप्तरंगी कलाविष्काराने उपस्थित मंत्रमुग्ध
- नूतन अभियांत्रिकीमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी
- ‘वारस प्रमाणपत्र’ संदर्भ पुस्तकाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न



