कार्यकर्त्यांचा एकच सूर काहीही झालं तरी आता माघार नाही
टाकवे बुद्रुक : भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने गाव भेट दौरा सुरू आहे गाव भेट दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी आंदर मावळ भागातील गावांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांनी भेटी देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी गावा गावात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने आलेल्या पदाधिकाऱ्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. काहीही झाले तरी , माघार घ्यायची नाही .मावळ विधानसभा लढवायची असा चंगच जणू , भारतीय जनता पार्टीने बांधला आहे. त्यादृष्टीने भाजप आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री बाळा भेगडे व भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष गणेश भेगडे , भाजपा मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे हे भाजपचे तीनही प्रमुख नेते गाव भेट दौऱ्यात सहभागी असल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे.
यामुळे येणाऱ्या काळात “आपल मावळ आपलं कमळ” “आता माघार नाही” “आमचं ठरलंय” या भूमिकेवर कार्यकर्ते अग्रेसर असून येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीच्या वतीने मावळ विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभा केला जाईल तो निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्ते जीवाचे रान करतील अशी भूमिका गावागावातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या गावभेट दौऱ्यानिमित्त नेत्यांच्या कानावर घातल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच गाव भेट दौऱ्यात कार्यकर्त्यांच्या मगिणीला प्रतिसाद देताना , “गावातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपला बूथ जिंकण्यासाठी आजपासून जोमाने कामाला लागावे” अशा सूचना देखील नेत्यांनी या गावभेट दौऱ्याच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
या गावभेट दौऱ्यात , सावळा , निळशी , खांडी , कुसूर , बेंदेवाडी , डाहुली , कांब्रे , बोरवली , कुसवली , वहाणगाव , नागथली , शिंदेवाडी , वडेश्वर , माऊ , फळणे , टाकवे (बु.) या गावांना भेटी दिल्या.
याप्रसंगी ता.अध्यक्ष दत्तात्रय भाऊ गुंड,भाजपा जेष्ठ नेते निवृत्ती भाऊ शेटे, मा.सभापती गुलाब काका म्हाळसकर, मा.उपसभापती शांताराम बापू कदम, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब घोटकूले,युवा मोर्चा ता.अध्यक्ष नितीन मराठे,ता.सरचिटणीस रोहिदास असवले, ता.सरचिटणीस अभिमन्यू शिंदे, अंदर मावळ भाजपा अध्यक्ष गणेश कल्हाटकर , नाणे मावळ भाजपा अध्यक्ष अरुण कुटे , आंबळे ग्रा.सरपंच संपत कदम, ता.उपाध्यक्ष सुभाष देशमुख,सावळा ग्रामपंचायत चे सदस्य विश्वनाथ जाधव,रवि आंद्रे,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिजीत नाटक, डाहुली ग्रा.सदस्य उमेश पिंगळे,रामदास आलम,सुरेश आलम,युवा मोर्चा कार्याध्यक्ष किरण जगताप,युवा वॉरियर्स अध्यक्ष प्रणेश नेवाळे, बूथ अध्यक्ष बाळासाहेब शिंदे,संभाजी देशमुख यांच्यासह भाजपा चे सर्व गावातील प्रमुख पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- इंदोरीच्या चैतन्य इंटरनॅशनल स्कूलची विज्ञान आश्रमात शैक्षणिक सहल
- शिरगावात दहा फुटी अजगराला जीवदान:वन्यजीव रक्षक संस्थेचा पुढाकार
- टाटा उद्योगसमूह राष्ट्रप्रेमी: पद्मश्री पोपटराव पवार
- माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा :रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेत भरला पुन्हा वर्ग
- नाणोली तर्फे चाकण येथे रक्तदान शिबीराचे आयोजन