तळेगाव दाभाडे: इंदुरी कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवर जोडरस्त्यासह मोठ्या पुलाचे बांधकामासाठी ८ कोटी रुपये निधी मंजूर केल्याबद्दल रविंद्र भेगडे यांच्यातर्फे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले. भाजप मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांच्या पाठपुराव्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने ,इंदुरी कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवर जोडस्त्यासह मोठ्या पुलाचे बांधकामासाठी ८ कोटी रुपयांचा निधी नुकताच मंजूर केला. यासंबंधीचे मंजुरी पत्र देखील रविंद्र भेगडे यांना प्राप्त झाले होते. पूर्वनियोजित दौऱ्याच्या निमित्ताने , सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण पुणे येथे आले असता , रविंद्र भेगडे यांनी इंदोरी कुंडमळा येथील ग्रामस्थांसह मंत्रीमहोदयांची भेट घेऊन , समस्त ग्रामस्थ कुंडमळा इंदोरी व मावळ तालुक्यातील जनतेच्या वतीने त्यांचे आभार मानले.! याप्रसंगी, इंदूरी ग्रामपंचायत चे मा.ग्रा.पं सदस्य दत्तात्रय भेगडे,प्रगतशील शेतकरी संजय (आण्णा)भेगडे,भाजपा इंदोरी सोमाटणे गट अध्यक्ष मनोहर भेगडे ,कामगार नेते सूर्यकांत दादा भेगडे, गुलाबदादा भेगडे,अशोकराव भेगडे,गणेश भेगडे,सचिन भेगडे,मयुर शेलार आदी प्रमुख नागरिक उपस्थित होते.
- इंदोरीच्या चैतन्य इंटरनॅशनल स्कूलची विज्ञान आश्रमात शैक्षणिक सहल
- शिरगावात दहा फुटी अजगराला जीवदान:वन्यजीव रक्षक संस्थेचा पुढाकार
- टाटा उद्योगसमूह राष्ट्रप्रेमी: पद्मश्री पोपटराव पवार
- माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा :रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेत भरला पुन्हा वर्ग
- नाणोली तर्फे चाकण येथे रक्तदान शिबीराचे आयोजन