तळेगाव दाभाडे: येथे श्री.संत शिरोमणी नामदेव महाराज यांची ६७४वा संजीवन समाधी सोहळा येथील विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाने संपन्न झाला. भाविकांचा या सोहळ्यास उस्फूर्त प्रतिसाद लाभला.
शाळा चौकातील विठ्ठल मंदिरामध्ये पहाटे श्री.विठ्ठल रखूमाईची महापूजा व अभिषेक अमित भांबोरे परिवाराच्या वतीने करण्यात आला.काकड आरतीचे आयोजन करण्यात आले.संत शिरोमणी नामदेव महाराज गाथा पारायण सोहळा हभप मुरलीधर महाराज ढेकणे यांच्या मार्गदर्शनाखाली बारा दिवस आयोजित करण्यात आला.
या गाथा पारायण सोहळ्याचा समारोप ,ग्राम प्रदक्षिणा पालखी सोहळा व नामदेव पायरीला पुष्पवृष्टी करण्यात आली. आरती व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी नामदेव शिंपी समाजाचे दिलीप हेंद्रे, नारायण हेंद्रे ,हरिदास वनारसे, अरुण हेंद्रे, अमोल सलागरे, मोहन डंबे ,मीना डंबे यांच्यासह नामदेव शिंपी समाजाचे पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते
सायंकाळी ह भ प उद्धव महाराज कोळपकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. श्री विठ्ठल मंदिराचे विश्वस्त बाळकृष्ण आरडे, यतीन भाई शहा ,प्रशांत दाभाडे, श्याम भेगडे, मृदुंगमणी खराडे महाराज, दिनेश दरेकर यांनी विशेष सहकार्य केले. या सप्ताहात मंदिराचे पुरोहित अतुल देशपांडे यांनी संपूर्ण नियोजनात पुढाकार घेतला.