तळेगाव दाभाडे:
नवलाखउंब्रे ग्रुप ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या निवडणूकीत अलका बाळासाहेब बधाले  बहुमताने निवडू आल्या. प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा त्यांना अधिकची मते मिळाली.

मावळत्या सरपंच सविता रामनाथ बधाले यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पदाच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.

सरपंच पदासाठी बधाले आणि अन्य एका महिला सदस्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. विहित वेळेत उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने सरपंच पदासाठी मतदान घेण्यात आले,या निवडणुकीत बधाले यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारास पेक्षा जास्तीची मते घेतली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिका-यांनी अलका बाळासाहेब बधाले यांची सरपंच पदी निवड जाहीर केली.

बधाले यांची सरपंच पदी निवड जाहीर होताच,समर्थकांनी भंडारा गुलालाची उधळण करीत जल्लोष केला
फटाक्यांची अतिषबाजी केली. मिरवणूक काढण्यात आली
नवनिर्वाचित सरपंच बधाले यांनी ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

सरपंच अलका बधाले म्हणाल्या,” शासनाच्या विविध योजना राबवून विकास कामांना प्राधान्य देणार आहे.महिला सक्षमीकरणासह आरोग्य,शिक्षण,वीज,पाणी पुरवठा,स्वच्छता,आरोग्य या बाबीवर विशेष लक्ष केंद्रित करणार आहे.

error: Content is protected !!