वडगाव मावळ:
वडगाव मावळ ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय सुराणा यांची मावळ तालुका सरपंच परिषदेच्या संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद मुंबईचे प्रदेश उपाध्यक्ष अँड. विकास जाधव यांनी सुराणा यांना निवडीचे पत्र दिले आहे.

ग्रामविकास, ग्रामपंचायत व त्या अनुशंगाने सरपंच, उपसरपंच व सदस्य या साठी राज्यात कार्यरत असलेल्या सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र ही संघटना आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आपण ग्रामीण भागातील प्रश्न शासन दरबारी मांडून ग्रामीण भागाला नेहमीच न्याय देण्याची महत्वपुर्ण भुमिका पार पाडत असतात.

या भुमिकेकडे पाहून आपण ही ग्रामीण भागाच्या विकासाचे शिलेदार आहात. या भावनेने सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र आपणास मावळ तालुका सरपंच परिषदेचे संपर्क प्रमुख या पदावर नियुक्त करत आहे,अशा आशयाचे निवड पत्र सुराणा यांना देण्यात आले आहे.

मावळ तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच व सदस्य यांची एकत्रित मोट परिषदेच्या माध्यमातून बांधून. सरपंच परिषदेच्या ध्येय धोरणांनुसार कार्यरत राहून सभासद नोंदणी आणि सरपंच परिषदेचे संघटन संपूर्ण तालुक्यात तसेच जिल्हयात वाढवण्यासाठी योगदान द्याल असा आशावाद या पत्रात करण्यात आला आहे.

error: Content is protected !!