वडगाव मावळ:
आंबळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्ष पदी हनुमंत हांडे यांची तर उपाध्यक्ष पदी सिताराम आंभोरे यांची निवड झाली. हांडे आणि आंभोरे यांची अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी निवड होताच समर्थकांनी भंडारा गुलालाची उधळण केली.

यावेळी मोहन घोलप ( सरपंच) , शंकर आंभोरे ( पाटील) ,बंडू घोजगे (कु उ बा स स), विलास भालेराव,ज्ञानेश्वर भांगरे
,गोविंद आंभोरे,दत्तात्रय वायकर,रामदास शेटे ,पांडुरंग शेटे ,बंडू कदम ,चंद्रकांत घोलप ,पांडुरंग आंभोरे,मंगेश चतूर
,बाबाजी वायकर, गोरख घोलप,भरत आंभोरे,नवनाथ भांगरे,सिंधूबाई शेटे,सुलाबाई कदम,दत्तात्रय वारींगे  ( सचिव)उपस्थित होते.

नवनिर्वाचित अध्यक्ष हनुमंत हांडे म्हणाले,”  विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थे मार्फत शेतकऱ्यांना विविध प्रकारचे कर्ज पुरवठा केला जातो.शेतक-यांनी कर्ज घेऊन शेतीपुरक व्यवसायात प्रगती करावी. तसेच कर्जाची वेळेवर परतफेड करून शून्य टक्के व्याजदराचा लाभ घ्यावा.

error: Content is protected !!