वडगाव मावळ:  मावळ तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या संचालिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळवाडी ता. मावळ येथील उपशिक्षिका संगीता शिरसाट यांची पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ महिला आघाडी कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष केशवराव जाधव यांनी दिले.
यावेळी नगरपालिका महानगरपालिका प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष  अर्जुन कोळी , महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे संपर्कप्रमुख  हनुमंतराव शिंदे,पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष  नारायण कांबळे, सरचिटणीस  सुरेंद्र गायकवाड,कार्याध्यक्ष संजय हुले,कोषाध्यक्ष विलास थोरात,संपर्कप्रमुख अंकुश साबळे, प्रसिद्धी प्रमुख गणेश कुंभार,बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्षराहुल होळकर, आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष  राजू मिसाळ, सरचिटणीस  जयप्रकाश बागडे, मावळ तालुका प्राथमिक शिक्षक संघ महिला आघाडीच्या नेत्या  सुरेखा सोनवणे, संगीता गोडे,  वनिता पोंक्षे, बाळासाहेब दिघे,  संजय रणदिवे उपस्थित होते.

error: Content is protected !!