
वडगाव मावळ: पतसंस्थेच्या अध्यक्षाची मनमानी आणि त्याला कंटाळून चार संचालकांनी दिलेले राजीनामे यामुळे मावळ तालुक्यातील चांदखेडच्या श्री. समर्थ रघुनाथबाबा ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे.तसा आदेश मावळचे सहाय्यक निबंधक सर्जेराव कांदळकर यांनी दिले.
या संस्थेवर प्रशासकीय कामकाज करण्यासाठी गंगाधर पिराजी कोत्तावार, उपलेखापरीक्षक सहकारी संस्था ता. मावळ, जि. पुणे यांची नियुक्ती करण्यात आली.आहे. प्रशासकांचा कालावधी सहा महिने राहणार आहे. या कालावधीत प्राधिकृत अधिकारी यांनी संस्थेच्या व्यवस्थापक समितीची निवडणूक घेऊन नवनिर्वाचित समितीकडे पदभार सुपुर्त करावयाचा आहे.
योगेश रामचंद्र गायकवाड रा.मु.पो. चांदखेड यांनी ०९/१२/२०२४ रोजी तक्रार अर्ज दिला होता. तर पतसंस्थेचे संचालक दिनेश गायकवाड, विकास गायकवाड, सत्यवान गायकवाड, अमित गायकवाड यांनी राजीनामे दिले होते.हे राजीनामे वार्षीक साधारण सभेत मंजुरी दिल्याचे स्पष्ट झाले या अनुषंगाने सहाय्यक निबंधक कार्यालयाने प्रशासकाची नेमणूक केली.
- ध्येय साध्य करण्यासाठी जीवापाड मेहनत करा : सहाय्यक विभागीय अधिकारी गायकवाड
- गावपातळीवर दिव्यांग सर्वेक्षण सुरू
- बालनाट्य स्पर्धेत जैन इंग्लिश स्कूल व आदर्श विद्या मंदिर प्रथम
- मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव शहरातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रावर जाण्यायेण्यासाठी बसेसची मोफत सेवा सुरू
- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवास सेवा,उपक्रमाचे नववे वर्ष : आमदार सुनिल शेळके यांचा पुढाकार


