
बार्शी – महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यामध्ये डिजिटल पत्रकारिता क्षेत्रामधील संपादक व पत्रकारांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी कार्य करणारी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेची बार्शी तालुका कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ संपादक राजा माने यांच्या आदेशानुसार बार्शी तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. बार्शी तालुका अध्यक्ष पदी धिरज शेळके, ग्रामीण तालुका उपाध्यक्ष पदी भैरवनाथ चौधरी, शहर उपाध्यक्ष पदी अभिजीत शिंदे, सचिव पदी गणेश शिंदे, खजिनदार पदी किरण माने, संघटक पदी गोविंद भिसे, संपर्कप्रमुख पदी संतोष राजगुरु तर महिला आघाडी तालुका उपाध्यक्ष पदी वैशाली ढगे यांची नियुक्ती करण्यात आली.
तसेच अजय पाटील यांची राज्य कार्यकारिणी सदस्य पदी, विजय कोरे यांची पश्चिम महाराष्ट्र सहसचिव पदी तर दिनेश मिटकरी यांची सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड नियुक्ती करण्यात आली.
यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत, राज्य संघटक मुरलीधर चव्हाण, राज्य कोषाध्यक्ष अमित इंगोले, राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष सूर्यवंशी यांच्या शुभहस्ते सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी बार्शी कार्यकारिणी सदस्य अक्षय बारंगुळे, राहुल भालशंकर, दत्तात्रय गुरव, विश्वास वीर, प्रतिज्ञा वाळके आधी उपस्थित होते.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना राज्यातील सर्वच प्लॅटफॉर्मवरील संपादक व पत्रकारांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी तसेच पत्रकारांच्या कुटुंबीयांना शिक्षण, आरोग्य व संरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये कटिबद्ध असून, सध्या महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक राज्यामध्ये चालू असलेले संघटनेचे कार्य लवकरच देशव्यापी होणार असल्याचे राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत यांनी आपल्या शुभेच्छा पर मनोगतात म्हटले.
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे तिसरे महाधिवेशन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये लवकरच होणार असल्याची घोषणा यावेळी राज्य संघटक मुरलीधर चव्हाण यांनी केली. याप्रसंगी उपस्थित राज्य कोषाध्यक्ष अमित इंगोले व राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष सूर्यवंशी यांनी देखील सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
- ध्येय साध्य करण्यासाठी जीवापाड मेहनत करा : सहाय्यक विभागीय अधिकारी गायकवाड
- गावपातळीवर दिव्यांग सर्वेक्षण सुरू
- बालनाट्य स्पर्धेत जैन इंग्लिश स्कूल व आदर्श विद्या मंदिर प्रथम
- मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव शहरातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रावर जाण्यायेण्यासाठी बसेसची मोफत सेवा सुरू
- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवास सेवा,उपक्रमाचे नववे वर्ष : आमदार सुनिल शेळके यांचा पुढाकार


