पिंपरी:  रत्नदीप मित्रमंडळ, थेरगाव या संस्थेमार्फत प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतमाता पूजन आणि इलेक्ट्रॉनिक कचरा संकलन या उपक्रमाचे हार्बिंगर समूहाच्या सहकार्याने आयोजन केले आहे.
ई-यंत्रण २०२५ अभियानांतर्गत पिंपरी  – चिंचवड ई-कचरा जनजागृती व संकलन  रविवार, दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९:०० ते १०:०० या वेळेत आरोग्यधन आयुर्वेद आणि पंचकर्म केंद्र, लेन – अ, रत्नदीप कॉलनी, टीजेएसबी बँकेच्या मागे, वाकड रस्ता, डांगे चौक, थेरगाव येथे करण्यात येणार आहे.
नादुरुस्त आणि निरुपयोगी वस्तूंची सुरक्षितपणे विल्हेवाट कशी लावावी, हा प्रश्न घरोघरी निर्माण झाला आहे. आरोग्य आणि पर्यावरणाला घातक असलेला ई-कचरा सुरक्षितरीत्या संकलित करणे ही एक छोटीशी देशसेवा आहे. यासाठी आपल्याकडील टाकाऊ आणि निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू आणून द्याव्यात, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष प्रकाश गुजर यांनी केले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना मोबाइल, केबल, चार्जर, टीव्ही, सेट टॉप बॉक्स, लॅपटॉप, ओव्हन, माऊस, की बोर्ड इत्यादी निरुपयोगी वस्तू द्याव्यात. या वस्तूंचे पुनर्वापर केंद्रावर रबर, प्लास्टिक, कॉपर, ॲल्युमिनियम असे वर्गीकरण करून त्याचा पुनर्वापर केला जाईल. मात्र, काचेचे बल्ब, ट्यूब, स्फोटक वस्तू, खेळणी आणि कपडे देऊ नयेत, असे गुजर यांनी सांगितले.

error: Content is protected !!