तळेगाव दाभाडे:महाराष्ट्र साहित्य परिषद मावळ शाखेच्या वतीने या रविवारी, दिनांक 28 जुलै 2024 रोजी, सकाळी 11 वाजता संजीवनी मुलींचे वसतिगृह, तपोधाम कॉलनी येथे साहित्यप्रेमींसाठी वाचन कट्ट्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या  मेळ्यात विविध साहित्यिकांच्या रचना अभिवाचित केल्या जाणार आहेत. विशेष आकर्षण म्हणून श्रीकृष्ण पुरंदरे यांची “सुखी जीवनाभोवती” ही नाटिका हर्षल आल्पे आणि योगंधरा बढे यांच्या सादरीकरणात अभिवाचित होणार आहे. याशिवाय ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांची कथा, श्रीकृष्ण पुरंदरे आणि प्रकाश गोळे यांची “घारीचे कौतुक” ही कथा ओंकार वर्तले यांच्या आवाजात ऐकता येणार आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांची “वारी” ही कथा हर्षल आल्पे अभिवाचित करतील.

साहित्यप्रेमी रसिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद मावळ शाखेचे अध्यक्ष श्रीकृष्ण पुरंदरे, प्राध्यापक योगेश घोडके (सचिव) आणि कार्याध्यक्ष ओंकार वर्तले यांनी केले आहे.मसाप मावळ शाखा मनापासून रसिकांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करीत आहे.

error: Content is protected !!