
पिंपरी:संस्कार प्रतिष्ठांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे इयत्ता दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभाचे आयोजन केले जाते. यावर्षी संस्कार प्रतिष्ठानचा गुणगौरव समारंभ महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र उद्योग नगर येथे आयोजित केला होता .
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कामगार कल्याण केंद्रप्रमुख प्रदीप बोरसे होते.
यांच्या हस्ते सात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आले .यावेळी प्रदीप बोरसे म्हणाले,” आपण चांगल्या पद्धतीने इयत्ता दहावी आणि बारावी मध्ये गुण संपादन केल्यामुळे आपल्याला पुढील यश संपादन करण्यासाठी अजून परिकष्टा करावी लागेल मेहनत केल्याने त्याचा फळ नेहमी चांगलाच मिळते. आपल्या उज्वल भविष्यासाठी आम्ही आपल्या खंबीरपणे पाठीशी उभे आहोत आपल्या पुढील यशासाठी माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा .
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर मोहन गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.संस्थेचे कार्याध्यक्ष राजेंद्र फडतरे ,संस्थेचे खजिनदार मनोहर कड यांनी स्वागत केले. संस्थेचे सचिव आनंद पाथरे यांनी सुत्रसंचालन केले. आभार संस्थेच्या संचालिका प्रिया पुजारी यांनी मानले.
या कार्यक्रमाचे संयोजन संध्या स्वामी आनंद, पुजारी मिनाक्षी मेरूकर ,कल्पना तळेकर, पल्लवी नायक यांनी केले.
- हरकचंद रायचंद बाफना डी.एड कॉलेजची शैक्षणिक सहल
- मुरलीधर गरूड यांचे निधन
- सुदवडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गुलाब दत्तात्रय कराळे (पाटील) बिनविरोध निवड
- सह्याद्री इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी आणि शिक्षकांचे तामिळनाडूतील कार्य अभिमानास्पद
- संविधान हा भारतीय लोकशाहीचा आत्मा! – ॲड. सतिश गोरडे




