
खोपोली नगर परिषदेच्या वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ
प्रतिनिधी श्रावणी कामत
खोपोली : शहरातील शेडवली पाण्याच्या टाकी परिसरात “मियावॉकी पद्धतीने” वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ खोपोली नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील यांचे हस्ते वृक्षारोपण करून झाला. खोपोली शहरातील विविध सेवाभावी संस्थाचे पदाधिकारी, खोपोली नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि विवीध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली.
मियावॉकी पद्धतीने वृक्ष लागवड ही सध्याची गरज आहे. कमी जागेत जास्त संख्येने झाडांची संख्या वाढविणे ही आगामी काळात करणे आवश्यक असल्याने अश्याच उद्यानांची निर्मिती शहरातील विविध भागात करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन डॉ पंकज पाटील यांनी केले. वृक्ष लागवडीनंतर त्यांचे संगोपन करण्याकरिता ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
डॉ साईनाथ अहिर आणि खोपोली नगर परिषदेचे उद्यान पर्यवेक्षक निलेश लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबवण्यात येणार आहे. या लागवडी करीता 2500 विविध जातीच्या फळ, फुल आणि दुर्मिळ औषधी वनस्पतींची निवड करण्यात आली आहे.
यशवंती हायकर्स, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, खोपोली बॉडी बिल्डर असोसिएशन, ज्येष्ठ नागरिक संघ अशा विविध संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. उपमुख्याधिकारी गौतम भगळे, विश्वास पाटील, प्रवीण भोई आणि कर्मचारी वर्ग या समारंभात सहभागी झाला होता.
- ध्येय साध्य करण्यासाठी जीवापाड मेहनत करा : सहाय्यक विभागीय अधिकारी गायकवाड
- गावपातळीवर दिव्यांग सर्वेक्षण सुरू
- बालनाट्य स्पर्धेत जैन इंग्लिश स्कूल व आदर्श विद्या मंदिर प्रथम
- मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव शहरातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रावर जाण्यायेण्यासाठी बसेसची मोफत सेवा सुरू
- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवास सेवा,उपक्रमाचे नववे वर्ष : आमदार सुनिल शेळके यांचा पुढाकार




