तळेगाव दाभाडे :
येथील माजी नगरसेवक गोपाळ दगडू परदेशी(वय ५४) यांचे रविवार (ता. २८)ला हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.राजकारण,समाजकारण व पत्रकारिता यात ते सक्रीय असायचे.
सकाळी दहा वाजता राहत्या घरापासून त्यांची निघणार आहे.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे ते माजी नगरसेवक, आवाज न्युजचे संपादक, दुर्गामाता मंदिराचे विश्वस्त अध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी निभावल्या. त्यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखदायक असून तळेगाव दाभाडे येथील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. नेहमीच हसमुख स्वभाव असणार गोपाल परदेश सदैव समाजातील विविध उपक्रमात आवर्जून सहभागी होत. त्यांच्या निधनावर राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे.
- चैतन्य इंटरनॅशनल स्कूल सीबीएसई शाळा महाराष्ट्र स्कूल मेरिट पुरस्काराने सन्मानित
- बापूसाहेब भेगडे यांनी महामंडळ नाकारले: विधानसभेच्या उमेदवारीची मागणी
- रेल्वे प्रवासात हरवलेले दागिने आणि महत्वाची कागदपत्रे मिळाली परत
- अरुण गराडे साहित्य प्रतिभा पुरस्काराने सन्मानित
- गीता कधीही कालबाह्य होत नाहीचिन्मय मिशन आंतरशालेय गीता पाठांतर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद