तळेगाव स्टेशन:
थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन करण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा वराळे जवळ  इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
मयूर भाटी असे नदीत बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तो आपल्या मित्रांसोबत इथे आला होता.
मयूर भाटी या तरुणाचा इंद्रायणी नदीत बूडून मृत्यू झाला आहे. मयूर हा आपल्या मित्रांसमवेत वराळे इंद्रायणी नदी काठी थर्टी फर्स्टची पार्टी करण्यासाठी आला होता. यावेळी मयूर हा पाण्यात पोहोण्यासाठी उतरला मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा बु़डून मृत्यू झाला. सोबत आलेल्या मित्रांना मयूर बुडाल्याचे समजताच त्यांनी मदतीसाठी स्थानिक ग्रामस्थांना बोलावलं, मात्र तोपर्यंत खूप उशिर झाला होता. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मयूरचा मृतदेह नदीबाहेर काढला.

error: Content is protected !!