वडगाव मावळ:
जुनी पेन्शन चालू करावी या मागणीसाठी शासकीय कर्मचारी आज पासून संपावर गेले आहे. शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना शासनाच्या वतीने मिळणारी नविन पेन्शन रद्द करून जुनीच पेन्शन योजना लागु करावी यासह विविध मागण्यासाठी राज्य पातळीवरील विविध शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी संप पुकारला आहे.
   शासकीय कर्मचाऱ्यांच्या या  राज्यव्यापी बेमुदत संपात मावळ तालुक्यातील कर्मचा-यांनी  सहभाग नोंदविला आहे.
महाराष्ट्र शासनाने जुनी  पेन्शन योजना बंद करीत शासकीय कर्मचाऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोप करण्यात येत आहे. जुनी पेन्शन योजना पुर्वरत सुरू करावी यासाठी येथे  दिनांक १४ डिसेंबर २०२३ पासुन होणाऱ्या शासकीय कर्मचारी यांच्या बेमुदत संपात तालुक्यातील शेकडो कर्मचारी सहभागी होणार आहे.
तालुक्यातील विविध शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांचा संपात सहभागामुळे नागरिकांच्या अनेक शासकीय कामांचा खोळंबा होणार असुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कामात  याचा विपरित परिणाम होणार आहे.महाराष्ट्र शासनाच्या विविध शासकीय सेवेतील कर्मचारी नविन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना सुरू करावी या मागणीसह विविध न्यायायीक मागण्यांसाठी हा संप असल्याचे कर्मचारी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

error: Content is protected !!