सामाजिक पुरस्काराने चेतन वाघमारे यांना सन्मानित
कामशेत:
मावळ वार्ता परिवार लोणावळा याच्या वतीने दिला जाणारा विशेष सामाजिक कार्यची पुरस्कार या वर्षी चेतन मोहन वाघमारे  यांना  देण्यात आला. सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी च्या विशेष सामाजिक  पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या संत तुकाराम कारखाने चे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, संतोष कुंभार, मोहन वाघमारे, संजय अडसूळे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
चेतन वाघमारे  वतीने मावळ तालुक्यात शालेय विद्यार्थीयांसाठी अनेक सामाजिक उपक्रम घेतले जातात तसेच अनेक स्पधींचे विद्यार्थ्यांसाठी आयोजन केले जाते यामधून आतापर्यंत अनेक विद्यार्थीयांना त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी हातभार लागला आहे. त्यांच्या याच सामाजिक कार्याची दखल घेऊन आज त्यांना विशेष गौरविण्यात आले
या पुरस्कारामुळे सामाजिक कार्याची जबाबदारी आणखी वाढली आहे  सामाजिक कार्य करण्यासाठी या पुरस्कारांमुळे आणखी प्रेरणा मिळाली असल्याचे चेतन वाघमारे यांनी यावेळी सांगितले.

error: Content is protected !!