मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
तळेगाव स्टेशन :
सहकार क्षेत्रातील सहकारी संस्थांची विश्वासार्हता वाढविण्यासाठी संस्थाचे पदाधिकारी व संचालक मंडळानी विशेष परिश्रम घेतले पाहिजेत असे ठाम मत प्रेरणा सहकारी बॅंकचे महाव्यवस्थापक सुधीर नाखरे यांनी केले.
येथील मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेच्या २७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रमुख पाहुणे म्हणून नाखरे बोलत होते. या वेळी व्यासपीठावर मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष गणेश खांडगे, उपाध्यक्ष नंदकुमार शेलार, सचिव अविनाश पाटील, सहकारातील तज्ज्ञ सुनिल शेटे,सूर्यकांत जोशीं ,एकनाथ गायकवाड व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी संस्थेच्या वतीने क्रीडा क्षेत्रात आयनॅमॅन म्हणुन विशेष काम करणारे विशाल शेटे ,सी.ए. विशेष श्रेणीत उत्तिर्ण झालेले आदित्य गाडे ,प्रतिक गाडे, पोलीस परिक्षेत उत्तिर्ण झालेले ओंकार भेगडे, श्रुती मालपोटे , साक्षी घारे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष गणेश खांडगे म्हणाले,” सामाजिक भावनेतून उभ्या केलेल्या पतसंस्थेने सर्वसामान्य तरूणांना रोजगार व व्यवसायासाठी केलेल्या पत पुरवठय़ाने अनेकांची समाजातील पत उंचावली आहे. २७ वर्षे सतत ऑडिट वर्ग “अ ” मिळवण्याचा बहुमान पतसंस्थेने टिकवला आहे. संस्थेच्या हितासाठी अनेकांचा हातभार आहे.
यावेळी बोलताना नाखरे म्हणाले की ,” प्रत्येक सहकारी संस्थेच्या संचालकांनी आपली संस्था आहे असे समजून काम केले पाहिजे .सभेच्या वार्षिक अहवालाचे वाचन सचिव अविनाश पाटील यांनी केले. अध्यक्ष गणेश खांडगे , उपाध्यक्ष नंदकुमार शेलार यांनी यावेळी सभासदांना शुभेच्छा दिल्या. आभार संचालक सुहास गरुड यांनी तर सुत्रसंचालन राजू खांडभोर यांनी केले. खजिनदार विनायक कदम, संचालक महेंद्र ओसवाल ,रोहिदास गाडे समिर खांडगे , रमेश जाधव ,प्रशांत भागवत उपस्थित होते.
गणेश दत्ताराम घारे व्यवस्थापक, चंद्रकांत जिजाभाऊ पडवळ शाखा व्यवस्थापक कामशेत,विजय रघुनाथ शिंदे शाखा व्यवस्थापक देहूरोड, विनायक गंगाराम भेगडे,अमोल गुलाब भेगडे,किरण भास्कर खरात,आशा बाळासाहेब पिंजण,आत्माराम शंकर साठे,सागर गणेश धामणे,आदित्य नितीन फलके,अनिल रामचंद्र आढाळे, रूपाली साहेबराव शिंदे,जया अक्षय बुळे, सुरेखा निवृत्ती खांडभोर,सिद्धी अवधूत बारवे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
- चांदखेडला ‘बाप समजून घेताना’ व्याख्यान
- आयडेंटिटीशिल्ड समिट २०२५” प्रकल्प स्पर्धेत नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीना ५ लाखाचे बक्षीस
- डॉ.अरविंद ब.तेलंग वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिन स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी
- सर्वांचे प्रेम हेच जीवनाचे संचित : डॉ. श्रीपाल सबनीस
- मावळ तालुका निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत प्रतिक देशमुख, अजित करवंदे खुल्या गटात विजेते