लायन्स क्लब ऑफ लोणावळा लेजेन्ड्स च्या संस्थापक अध्यक्षपदी सुरेश गायकवाड यांची नियुक्ती
प्रतिनिधी : श्रावणी कामत
लोणावळा :लायन्स क्लब ऑफ लोणावळा लेजेन्ड्स च्या संस्थापक अध्यक्षपदी सुरेश गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली.
लायन्स क्लब चे प्रांतपाल मा लायन विजय भंडारी यांच्या शुभहस्ते लायन्स क्लब ऑफ लोणावळा लेजेन्ड्स या नूतन क्लब ची स्थापना करण्यात आली.
माजी प्रांतपाल लायन दीपक शहा यांनी नूतन सदस्यांना शपथ प्रदान केली. यावेळी त्यांनी नवीन क्लब च्या माध्यमातून किमान ५ नवे कायमस्वरूपी प्रकल्प सुरू करण्याचे आवाहन केले. नव्याने स्थापना झालेल्या लायन्स क्लब ऑफ लोणावळा लेजेन्ड्स च्या नूतन कार्यकारिणी ला माजी प्रांतपाल द्वारका जालान यांनी शपथ प्रदान करून सर्व कार्यकारिणीला त्यांच्या जबाबदारी संदर्भात मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी लायन्स संघटना व सामाजिक कार्य या विषयी आपल्या ओघवत्या वाणीने सर्वांसमोर आपले विचार मांडले.
यावेळी ज्येष्ठ राजेश मेहता यांनी लायन्स क्लब ऑफ लोणावळा लेजेन्ड्स च्या स्थापने संदर्भात माहिती दिली.
नवनिर्वाचित अध्यक्ष सुरेश गायकवाड यांनी पदभार स्वीकारला व त्यावेळी त्यांनी क्लब च्या सदस्यांचे व सर्वांचे आभार मानले व आपल्या भावी कार्याबद्दल माहिती दिली.
यावेळी त्यांनी काही कायमस्वरूपी प्रकल्प जाहीर केले. त्यामध्ये गरजू मुलींना सायकल वाटप, तसेच लोणावळा येथून निगडी व खोपोली येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी बस स्थानक, लायन्स डेंटल केअर सेंटर याचे मान्यवरांच्या उपस्थितीत औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमात *Legend of Lonavala* या पुरस्काराचे मानकरी भरत अगरवाल नागरी पत संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती लता भरत अगरवाल व श्रद्धा हॉस्पिटल लोणावळा चे संचालक डॉ शैलेश शहा यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले .या प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार वाळंज, लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला लायन्स क्लब ऑफ पूणे गणेशखिंड चे अध्यक्ष मुकेश गदिया, रिजन चेअरमन आनंद खंडेलवाल, झोन चेअरमन अनंत गायकवाड, श्याम खंडेलवाल, राजेंद्र गोयल, आनंद आंबेकर, सुनील चेकर, हेमराज मेघनानी, सतीश राजहंस, डॉ शाळीग्राम भंडारी, महेश शहा, प्रशांत शहा, डॉ हिरालाल खंडेलवाल, राजेश अगरवाल, गिरीष पारख, मुबसिर कॉन्ट्रॅक्टर, संजय गोळपकर व विविध क्लब चे पदाधिकारी व सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी माजी उपनगराध्यक्षा आरोही ताळेगावकर, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पूजारी, माजी उपनगराध्यक्ष धीरूभाई कल्याणजी, भरत अगरवाल पतसंस्थेच्या अध्यक्ष लता अगरवाल, डॉ शैलेश शहा, माजी नगरसेवक संजय गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य बाळासाहेब पायगुडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे, लोणावल्यातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात राजेश मेहता व डॉ हेमंत अगरवाल यांचा प्रांतपाल विजय भंडारी यांनी विशेष सत्कार केला. मीनाक्षी गायकवाड यांनी गणेश वंदना सादर केली,
रमेश लुणावत, हेमंत अगरवाल, अमित अगरवाल, विवेक घाणेकर, रामदास दरेकर, बनवारी गुप्ता, विजय रसाळ, समीर भल्ला यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.
कीर्ती अगरवाल, सौ स्मिता गुजर, वैशाली साखरेकर, सुनीता रावण, नूतन घाणेकर, मिता भल्ला यांनी सर्वांचे स्वागत केले . रमेश लुणावत यांनी आभार प्रदर्शन केले.
उमा मेहता, प्राची पाटेकर, प्रतिभा दरेकर यांनी सूत्रसंचालन केले.
- विकासकामे केली म्हणता, मग पैसे, साड्या का वाटता?
- देहूगावात विकासाच्या जोरावर सुनील शेळके यांच्या प्रचारासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी
- आमदार सुनील शेळके यांना मोदींचा आशीर्वाद ‘विजयी भव’!
- समर्थ विद्यालयात तब्बल ४२ वर्षांनी भरला इ.१०वीचा वर्ग देश विदेशातून विद्यार्थ्यांची हजेरी
- औद्योगिक नगरीत मतदार जनजागृती अभियान