
पवनानगर : संत रामजीबाबा उत्सवानिमित्त चांदखेड मध्ये विद्यार्थ्यांकरिता, पालकांकरिता वसंत हंकारे ‘ यांचे बाप समजून घेताना व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.या व्याख्यानाचे आयोजन रोटरी क्लब ऑफ मावळ,चांदखेड ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते.
आपल्या आई-बापाला शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावा, त्यांच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा, कारण आई ,बापाचा श्वास निघून गेला तर भिंतीवरच्या फोटोतील आई-बाप कधीच तुम्हाला जीव लावायला येणार नाही याची जाणीव ठेवा, असे विचार व्याख्याते डॉ. वसंत हंकारे यांनी मांडले.
यावेळी रोटरी क्लबचे संस्थापक रो.मनोज ढमाले अध्यक्ष नितीन घोटकुले,उपाध्यक्ष रेश्मा फडतरे, रो.सुनील पवार रो.ॲड.दीपक चव्हाण रो. राजेंद्र दळवी, प्राध्यापक सावंत,माजी उपसरपंच पौरस बारमुख, सचिन घोलप, सचिन आगळे,नितीन टेकळे,विठ्ठल कदम,सचिन गायकवाड,मयुर कोंडे यांच्यासह आदी गावचे सरपंच, ग्रामस्थ, इतर शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यु इंग्लिश स्कूल चे सत्यवान पवार सर यांनी सूत्र संचालन केले,रेश्मा फडतरे यांनी प्रास्ताविक केले.तर नितीन घोटकुले यांनी स्वागत केले,व्याख्यान झाल्यावर ग्रामस्थांच्या वतीने पौरस बारमुखं यांनी सर्वांचे आभार मानले.
- ध्येय साध्य करण्यासाठी जीवापाड मेहनत करा : सहाय्यक विभागीय अधिकारी गायकवाड
- गावपातळीवर दिव्यांग सर्वेक्षण सुरू
- बालनाट्य स्पर्धेत जैन इंग्लिश स्कूल व आदर्श विद्या मंदिर प्रथम
- मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव शहरातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रावर जाण्यायेण्यासाठी बसेसची मोफत सेवा सुरू
- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवास सेवा,उपक्रमाचे नववे वर्ष : आमदार सुनिल शेळके यांचा पुढाकार



