पिंपरी:
  अग्निशामक दलातील वीरांच्या कामाचे कौतुक करीत निगडी करांनी त्यांना सलाम केला आहे.त्याचे कारणही तसेच आहे,
विशाल सावळे यांनी स्वतः पिंपरी चिचवड महानगर पालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांना   फोन करून कळविले की मूकबधिर शाळा प्राधिकरण निगडी येथे एक व्यक्त दलदल मध्ये फसला आहे.

हा व्यक्ती फसल्याची वर्दी दिलेली वेळ होती 07:23AM इतकी. ही माहिती मिळताच प्राधिकरण उप अग्निशमन केंद्रातील कर्मचारी सकाळी(07:24AM) वाजता(MH14 CL1657) या वाहनातून  घटनास्थळी रवाना झाले.कर्मचारी  गौतम इंगवले( सब ऑफिसर), संपत गौंड (लीडिंग फायरमन ), प्रदीप हिले (वाहन चालक), काशिनाथ ठाकरे (फायरमन), अजय साळुंखे (ट्रेनी फायरमन) यांनी
घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

एक व्यक्ती दलदल मध्ये ऋतून बसल्याचे आढळून आले.या बाबत गांभीर्य ओळखून प्राधिकरण उप अग्निशमन केंद्र तील कर्मचाऱ्यांनी या  व्यक्तीस शिडी , दोर , सीलिंग हुक च्या साहाय्याने त्या  ठिकाणी पोचून सदर व्यक्तीस सुखरूपपणे बाहेर काढले व त्यांच्या घरच्यांच्या स्वाधीन केले. दलदलीत अडकलेल्या व्यक्तिचे नाव आहे,निळकंठ पाटील  आणि त्यांचे वय वर्ष 65 अंदाजे इतके आहे.

दलदलतून सुखरूपपणे बाहेर पडलेल्या या व्यक्तीने अग्नीशामक दलाचे आभार मानले,कुटूबियांनीही समाधान व्यक्त केले तर.पिंपरी चिचवड महानगर पालिकेच्या या जवानांना निगडीकरांनी सलाम केला.

error: Content is protected !!