तळेगाव दाभाडे:
तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील नवलाख उंब्रे येथील जाधववाडी धरण येथे पूरजन्य परिस्थिती ,आपातकालीन परिस्थिती व आपत्ती व्यवस्थापनाबाबत डेमो कॅम्प घेण्यात आला.

कॅम्पमध्ये वन्यजीवन रक्षक मावळ संस्था ,राणी ॲम्बुलन्स ,बोट इत्यादी साहित्य वापरून सदरचा डेमो घेण्यात आलेला आहे, एखादा व्यक्ती बुडाल्यास त्याला कसे वाचवायचे याचे डेमो द्वारे प्रशिक्षण देण्यात आले तसेच नागरिकांना देखील सदरचा डेमो दाखवण्यात आला.

तळेगाव दाभाडे एमआयडीसी  पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावंत साहेब व इतर  पोलीस स्टाफ उपस्थित होता. तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे   संस्थेचे आपत्ती व्यावस्थापन सर्च आणी रेस्कु टिमचे अध्यक्ष गणेश निसाळ ,भास्कर माळी,जीगर सोळंकी,सर्जेस पाटिल, विनय सावंत,शुभम काकडे,सार्थक घुले,गणेश गायकवाड,अविनाश कार्ले,गणेश सोंडेकर,विकी दौंडकर,कुनाल दाभाडे ,श्रीयस भेगडे,सुरज शिंदे ,प्रशांत शेडे,गौरव चेपे,गणेश ढोरे सहभागी झाले होते.

रेस्कु टिम चे अध्यक्ष गणेश निसाळ यांनी सर्व पोलीस अधीकारी व कर्मचारी यांचे आभार मानले.

error: Content is protected !!