मुंबई:
जागतिक कीर्ती असलेल्या लोणावळ्यातील प्राचीन कैवल्यधाम योग संस्थेच्या Journey of Kaivalyadhama Yogic Science: An Odyssey of 100 Years” ( Documentary) माहितीपट प्रसारणाचे उद्घाटन Nariman Point मुंबई येथील National Centre for Performing Arts ( NCPA) मधील Godrej Dance Centre येथे झाले.

या माहिती माहितीपटामध्ये कैवल्यधाम योग संस्थेच्या उन्नतीचा  १०० वर्षाचा प्रवास दाखविण्यात आला आहे.
या माहितीपटाचे उद्घाटन माजी केंद्रीय रेल्वे मंत्री आणि कैवल्यधाम शताब्दी वर्ष समितीचे अध्यक्ष  सुरेश प्रभू तसेच कैवल्यधाम संस्थेचे मानद सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी  सुबोध तिवारी, उद्योगपती  नानिक रूपांनी , नितीन ठक्कर यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.

या कार्यक्रमास महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांची विशेष उपस्थिती होती. तसेच मुंबई आणि लोणावळा येथील पत्रकार, वेगवेगळ्या क्षेत्रातील योगप्रेमी मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी झाले होते. श्री सुबोध तिवारी यांनी श्री सुरेश प्रभू आणि श्री श्री राहुल नार्वेकर यांचा शाल आणि मानचिन्ह देऊन सत्कार केला.

सुरेश प्रभू आणि राहुल नार्वेकर यांनी आपल्या भाषणातून कैवल्यधाम योग संस्थेच्या १०० वर्षाच्या यशस्वी प्रवासाचे कौतुक आणि प्रसंशा करून संस्थेच्या शतकपूर्ती साठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन कुमारी अन्विता दीक्षित यांनी केले आणि या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सन्मानीय व्यक्तींचे तसेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या सहभागी झालेल्या मान्यवरांचे कैवल्यधाम योग संस्थचे सचिव श्री सुबोध तिवारी यांनी आभार मानले.

लोणावळा येथे १९२४ साली स्वामी कुवलयानंद जी यांनी कैवल्यधाम योग संस्थेची स्थापना केली होती. कैवल्यधाम योग संस्था २०२३ २४ मध्ये आपले शताब्दी वर्ष साजरे करीत असून २०२४ साली आपली शतकपूर्ती करीत आहे. या निमित्ताने २०२३-२४ या कालावधी मध्ये राज्य आणि देशातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसाठी योग विषयक वेगवेगळे उपक्रम आणि कार्यक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस आहे.

error: Content is protected !!