वडगाव मावळ:
पुणे ग्रामीण पोलीस दलातील राकेश शांताराम पालांडे यांची पदोन्नती झाली आहे,त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती झाली आहे.पदोन्नतीवर ते रावेत पोलीस ठाण्यात रूजू आहे. पालांडे यांच्या पदोन्नतीचे मावळ तालुक्यात अभिनंदन होत आहे.

पालांडे यांच्या नोकरीतील अनेक वर्ष मावळ तालुक्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गेली आहे. त्यामुळे मावळ तालुक्यातील सर्व नागरिकांशी त्यांचे उत्तम सलोख्याचे संबंध आहे. कायद्या सुव्यवस्थेबाबत सातत्याने आग्रही असणारे पालांडे यांची सर्व स्तरावर समाज बांधिलकीचे यापूर्वी आलेले अनेक अनुभवलेलेचे दाखले मावळ मधून व्यक्त होत आहे.

पालांडे बृहन्मुंबई पोलीस दलात १९९६ साली भरती झाले आहे. त्यानंतर मुंबई येथे मंत्रालय सहा वर्ष नोकरी करून २००२ साली त्यांची पुणे ग्रामीण येथे बदली झाली. कॉन्स्टेबल असताना जुन्नर पोलीस स्टेशन, देहूरोड पोलीस स्टेशन,बारामती शहर, वडगाव मावळ, लोणावळा ग्रामीण येथे त्यांनी नोकरी केली.

  नवनिर्मित पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील तळेगाव पोलीस ठाण्यात  विशेष शाखा येथेही त्यांनी नोकरी केली.  पदोन्नतीने बढती झालेल्या पालांडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!