वडगावच्या पोलीस निरीक्षक पदी कुमार कदम
वडगाव मावळ :
वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास भोसले यांची बदली झाली असून त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे ग्रामीण विभागातील व मावळ तालुक्यातील महत्वाचे पोलीस ठाणे असलेल्या वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भोसले यांचा दोन वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी त्यांची पुणे विभाग सुरक्षा शाखेत बदली केली आहे, तर त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी नियुक्ती केली आहे.

नवनियुक्त पोलीस निरीक्षक कदम यांचा मावळ ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष विजय सुराणा, सुदेश गिरमे, गणेश विनोदे यांनी सत्कार करून स्वागत केले.

error: Content is protected !!