तळेगाव दाभाडे:
पिंपरी चिचंवड एज्युकेशन ट्रस्ट तसेच नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च महाविद्यालयाच्या अंतर्गत सुरु असलेल्या बॅचलर ऑफ व्होकेशनल कोर्स मधील रबर टेक्नॉलॉजी कोर्स साठी ऑल इंडिया रबर इंडस्ट्री असोशिएशन (AIRIA) आणि रबर केमिकल अँड पेट्रोकेमिकल स्किल डेव्हलपमेंट कौन्सिल (RCPSDC) सोबत नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचा नुकताच करार झाला.

   या करारामार्फत रबर आस्थापनांमधील तज्ञ् व्यक्ती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. तसेच इंटर्नशिप, प्रकल्प भेटी यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना फायदा होईल.
    नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये डायमेंशनल मेट्रोलॉजी लॅब उभरण्यात आली असून आरसीपीएसडीसी आस्थापनेच्या माध्यमातून जवळपास ३५० हुन अधिक जोडलेल्या औदयोगिक आस्थापनांनमधील कर्मचाऱ्यांना या प्रयोगशाळेचा टेस्टिंग साठी उपयोग होईल तसेच विद्यार्थ्यांना स्किल कोर्सेस साठी याचा लाभ घेता येईल.
   
         या करारप्रसंगी एआयआरआयए चे चेअरमन रवींद्र बरदे, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे खजिनदार राजेश म्हस्के, विक्रम मकर, विनोद बंसल, आरसीपीएसडीसी चे चेअरमन विनोद पटकोटवर, पुणे चाप्टर चे व्हाईस चेअरमन निनाद जोशी, सदाशिव काळे, अवंतिका मकर,  प्रशांत वाणी, नितीन जोशी, संग्राम पाटील, सुनील बंसल, मिलिंद जोशी, डी. टी केसवानी, एनएमआईटीचे प्राचार्य डॉ. विलास देवतारे, एनसीईआर च्या प्राचार्या डॉ. अपर्णा पांडे, कार्यक्रमाचे आयोजन तसेच आयआयआयसी चे प्रमुख  प्रा. मुझाईद शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!