वडगाव मावळ:
मोरया प्रतिष्ठानने  वडगाव शहरातील  दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. गुणवंतांच्या पाठीवर मोरया प्रतिष्ठानने कौतुकाची थाप टाकली.

आयुष्याच्या महत्वाच्या परीक्षांपैकी सर्वात महत्वाची  पहिली परीक्षा म्हणजे दहावीची परिक्षा.अन त्या नंतर बारावीची परिक्षा. या दोन्हीही परिक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या शहरात गुणवंतांचा सत्कार करण्यात मोरया प्रतिष्ठानने पुढाकार घेतला.

दहावीनंतर खऱ्या स्पर्धात्मक युगाला सुरुवात होते.प्रत्येक पावलागणिक कोणीतरी आपल्याला मागे टाकण्यासाठी सज्ज असते ,आपल्याला आपल्या कार्यकर्तृत्वाने सर्वांच्या पुढे जायचे असते, या सर्व स्पर्धा  खिलाडू वृत्तीने सामोरे जात असताना येणारी खरी मजा दहावीनंतर सुरू होते,यासाठी कौतुकाची एक थाप  प्रेरणा आणि प्रोत्साहन देते,हीच प्रेरणा देण्याचे काम मोरया प्रतिष्ठानने केले.

यावर्षी झालेल्या महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षेत इयत्ता दहावी व बारावी मध्ये इंग्रजी माध्यम व मराठी माध्यम प्रथम, द्वितीय, तृतीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व शिवप्रतिमा देऊन गौरविण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे व मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम घेण्यात आला. यापुढील काळातसुद्धा आपण सर्वजण उत्कृष्ठ कामगिरी करत आपले पालक, शिक्षक, शाळा आणि आपल्या वडगाव शहराचे नाव अभिमानाने उंचावाल अशी अपेक्षा अबोली ढोरे यांनी व्यक्त केली.

नगराध्यक्ष मयूर ढोरे, मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे, नगरसेविका पूनम जाधव, उपाध्यक्षा चेतना ढोरे, प्रतिक्षा गट, जयश्री जेरतागी, सुषमा जाजू, संगीता दौंडकर, कविता नखाते, प्रतिभा ढोरे, कांचन ढमाले, सुरेखा गुरव, रुपाली आंब्रुळे, सोनाली वाडेकर, सायली ढोरे, सारिका धुमाळ, माया पुकळे, कविता बल्लारी, दिपाली येवले आणि विद्यार्थी, पालक  उपस्थित होते.

मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीने  मे महिन्यात वडगाव शहरातील माळीनगर, पंचमुखी मारुती मंदिर परिसर व केशवनगर या भागात महिला भगिनींसाठी आरी वर्क प्रशिक्षण घेण्यात आले होते. हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल समारोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील महिला भगिनींनी स्वावलंबी होण्यासाठी तसेच त्यांच्या कुटुंबाला मदतीचा हातभार लागावा म्हणून आरी वर्क प्रशिक्षण राबविण्यात आले होते.

येणाऱ्या कालावधीत महिला भगिनींना स्वताचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या खूप साऱ्या महिला भगिनी नक्कीच स्वताचा व्यवसाय सुरू करतील अशी अपेक्षा नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!