संकल्प सिद्धीचा गुरुमंत्र!
मित्रांनो,
जिथे बंधन आलं की तिथे- आकर्षणाचा जन्म होतो हे शाश्वत सत्य आहे! म्हणून जेव्हा आपण म्हणालात की मला युद्ध नको आहे तेव्हा सहाजिकच आपलं लक्षसुद्धा युद्धाकडे जात! त्याऐवजी मला शांतता हवी आहे.
तर– आपोआपच आपल लक्ष शांततेवर केंद्रित होईल! आकर्षणाच्या नियमानुसार– आपली उर्जा आणि प्रज्ञा एकत्र येतील आणि आपल्याला शांती प्राप्त होईल! अशाच प्रकारे मला अपयशाचं तोंड देखील बघायचं नाही! याऐवजी मी यशस्वी होणारच आहे असंम्हणूया.
मला स्थूलपणा कमी करायचा आहे या ऐवजी मला सडपातळ व्हायच आहे असं म्हणूया! माझ्या नोकरी-व्यवसायात मला फार संघर्ष करावा लागतो असं म्हणण्याऐवजी मला नोकरी-व्यवसायात आनंद आणि उत्साह प्राप्त होतो– असं म्हणूया! गृहिणीने माझ्या पतीबरोबर मला भांडायचं नाही असं म्हणण्याऐवजी पतीसोबत मला आनंदी सुखकारक नातं जुळवायच आहे असं म्हणया.
मूळतःहाच परिस्थितीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलायचा म्हणजे आपोआपच आपली मानसिकता सकारात्मक होईल! मित्रांनो- विचारात खूप मोठी शक्ती असते! कारण आपल्या विचारातूनच ऊर्जेचा प्रवाह वाहत असतो! जर आपल्याला नको आहे ते आपण बोललो तर नको असलेल्या गोष्टींकडे आपल्याही नकळत आपण आकर्षित होतो.
त्यामुळे मित्रांनो- होतं काय की- त्या विचारा बरोबरच आपली ऊर्जापण त्याच दिशेने जाते!- आपल्याला मला आज आवर्जून सांगायच आहे की- -आपण नको असलेल्या गोष्टींविषयी– विचाराबरोबरच बोलणंही थांबवणार आहोत! त्यासाठी आपण रोजच्या वापरात असणारे पुढील काही शब्द आपल्या बोलण्यातून निश्चितपणे वगळायचे आहेत.
उदाहरणार्थ– आळस- अपमान- अपयश -आजारपण- अपघात- अशा शब्दांचा उच्चार देखील आपण कटाक्षाने टाळायचा आहे! आजपासून आपण हाच संकल्प सोडूया! मित्रांनो- मला खात्री आहे की- आजचा हा आपण सोडलेला संकल्प कटाक्षाने पाळला तर आपण प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होणार आहात आणि हाच प्रत्येक क्षेत्रातील आपल्या यशस्वीतेचा गुरुमंत्र असेल!
(शब्दांकन – ला.डाॅ. शाळीग्राम भंडारी, तळेगाव दाभाडे)
- शिवराज पॅलेस ‘ बँक्वेट हाॅलचे सीता खंडू वायकर व खंडू आबाजी वायकर यांच्या हस्ते उद्घाटन
- महागाव येथे कालाष्टमी व श्री. काळभैरवनाथ जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
- इंदोरीत शनिवार दि.२३ नोव्हेंबरला समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन
- रविवार, २४ नोव्हेंबर रोजी गझलपुष्पचा वर्धापनदिन सोहळा : रविंद्र भेगडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
- संपतराव पांडुरंग गराडे यांचे निधन