पुणे:
मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे आणि उपसभापती नामदेव शेलार यांचा विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पुणे जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी बैठकी प्रसंगी विरोधीपक्ष नेते पवार यांच्या हस्ते शिंदे व शेलार यांचा सत्कार करण्यात आला. सभापती शिंदे व शेलार यांनी मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रस्तावित कामा बाबत विरोधीपक्ष नेते पवार यांना निवेदन दिले.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील , माजी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे,आमदार सुनिल शेळके, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, माजी कार्याध्यक्ष दिपक हुलावळे, तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत दाभाडे, माजी युवक अध्यक्ष सुनिल दाभाडे, तालुका सरचिटणीस रामदास वाडेकर, सचिन शिंदे उपस्थित होते.
विरोधीपक्ष नेते अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले.
- लोणावळ्यातील दाऊदी बोहरा समाजाने सर्व केला मिलाद-उन-नबी (SA) साजरा
- वातावरणातील बदलानुसार भात पिकावरील कीड रोग व्यवस्थापन करा
- जपान आस्थापन सदस्यांची चैतन्य इंटरनॅशनल स्कूलला सदिच्छा भेट
- कार्ल्यात रंगला लेकी मागण्याचा पारंपरिक खेळ
- कार्ला परिसरात गौरी व गणरायाला भावपूर्ण निरोप गणपती बप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या जयघोष