टाकवे बुद्रुक:
भोयरे  ग्रामपंचायतीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल महिला व बालकल्याण विभाग महाराष्ट्र शासन व ग्रामपंचायतींच्या वतीने ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन स्थानिक महिलांचा गौरव करण्यात आला.

मोनिका बाळू जांभुळकर व वैशाली कृष्णा जांभुळकर यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी सरपंच वर्षा अमोल भोईरकर,उपसरपंच ऋषिकेश तानाजी खूरसूले, ग्रामसेवक प्रमिला मारुती सुळके,ग्रामपंचायत सदस्य बाळू तानाजी भोईरकर, रामदास पारू भोईरकर, दिपाली जांभुळकर, नीता भोईरकर रंजना भोईरकर, संगीता वाघमारे मंदाताई आडीवळेअंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व उपस्थित ग्रामस्थ होते.

error: Content is protected !!