पवना विद्या मंदिर शाळेचा दहावीचा निकाल ९८.३४ टक्के,पवना विद्यामंदिर शाळेत अनुक्रमे रितेश ठुले प्रथम,प्रणाली घरदाळे व दिक्षा तुपे अनुक्रमे द्वितीय व तृतीय
पवनानगर – महाराष्ट्र राज्य शालांत प्रमाणपत्र परीक्षा दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून पवन मावळातील पवनानगर येथे असणा-या पवना शिक्षण संकुलातील पवना विद्या मंदिर शाळेचा निकाल ९८.३४ टक्के इतका लागला असून शाळेमध्ये मळवंढी ठुले येथील ग्रामीण भागात राहणारा रितेश पांडुरंग ठुले याने ९३ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला.
तर द्वितीय क्रमांक प्रणाली बबन घरदाळे ९२.६० टक्के तर तृतीय क्रमांक दिक्षा गोपाळ तुपे हिने ८९.६० टक्के मार्क मिळवला.
यांंच्यासह सर्व विद्यार्थींनी चांगले गुण मिळवत पवना शिक्षण संकुलाची चांगल्या निकालची परांपरा कायम ठेवली आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे वर्गशिक्षक वैशाली वराडे,महादेव ढाकणे,मंजुषा गुजर,रोशनी मराडे, बापुसाहेब पवार, राजकुमार वरघडे,भारत काळे,सुनील बोरुडे, संजय हुलावळे, गणपत ठोंबरे,सुनिता कळमकर व सर्व मार्गदर्शक अध्यापकांचे अभिनंदन नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री संजय भेगडे,संस्थेचे सचिव व पवना शालेय समिती अध्यक्ष संतोष खांडगे,प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, पर्यवेक्षिका निला केसकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.
- दादाभाऊ गणपत गायकवाड यांचे निधन
- पंचाहत्तरीनिमित्त निवेदक सुधीर गाडगीळ यांचा विशेष सत्कार व सांस्कृतिक संचित कार्यक्रम
- असवले इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये बालजत्रेची धूम
- कला-क्रीडा महोत्सवात अति दुर्गम भागातील खांडी शाळेने पटकविला मानाचा तुरा : पाचवी इयत्तेचा नक्ष भोकटे ठरला मावळ तालुकापातळीवरील बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता
- सांगिसे विद्यालयात सॅनिटरी डिस्पेन्सर व डिस्पोजल मशीनचे उदघाटन