प्रस्तावित न्यायालय मंजूर होण्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना निवेदन
पिंपरी:
पिंपरी – चिंचवड शहरात जिल्हा आणि सत्र न्यायालय ३, दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर ३, तसेच मोटार वाहन न्यायालय व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ४ न्यायालये इत्यादी मंजूर होण्याबाबत पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.
निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर सभागृह येथे पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ, माजी अध्यक्ष ॲड. सतीश गोरडे, उपाध्यक्ष ॲड. जयश्री कुटे, सचिव ॲड. गणेश शिंदे, सहसचिव ॲड. मंगेश नढे, सदस्य ॲड. नितीन पवार, ॲड. पवन गायकवाड, ॲड. अक्षय केदार, ॲड. सोहम यादव यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी निवेदनाचा स्वीकार केला.
मोशी प्राधिकरण येथील न्यायालयाकरिता प्रस्तावित जागेचा निधी मंजूर झाला असून जुलै अखेर भूमिपूजन करण्याबाबत आश्वासन मा उपमुख्यमंत्री यांनी बार असोसिएशनला दिले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार महेशदादा लांडगे उपस्थित होते.
- शिवराज पॅलेस ‘ बँक्वेट हाॅलचे सीता खंडू वायकर व खंडू आबाजी वायकर यांच्या हस्ते उद्घाटन
- महागाव येथे कालाष्टमी व श्री. काळभैरवनाथ जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
- इंदोरीत शनिवार दि.२३ नोव्हेंबरला समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन
- रविवार, २४ नोव्हेंबर रोजी गझलपुष्पचा वर्धापनदिन सोहळा : रविंद्र भेगडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
- संपतराव पांडुरंग गराडे यांचे निधन