चाकण:
भामा-आसखेड प्रकल्पग्रस्त शेतक-यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावे वेळ प्रसंगी पिंपरी-चिंचवड शहराला जाणाऱ्या पाईप लाईनचे काम बंद पाडू असा इशारा धरणग्रस्त शेतक-यांनी दिला आहे.
उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भामा-आसखेड धरणातील पाण्यावर तोडगा काढला आहे.. भामा-आसखेड धरणातून पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेला पाणी द्यायचे आणी पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी उद्योग धंध्याला द्यायचे … हा झाला पाण्याचा तोडगा पण भामा-आसखेड प्रकल्पात ज्या शेतकर्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्या शेतकर्यांचे काय ?
याचा विचार उपमुख्यमंत्री यांनी केला पाहीजे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश देऊन ही गेली पाच/सहा वर्ष शेतकर्यांना पर्यायी जमिनेचे वाटप सरकार करू शकले नाही ? भामा-आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनी यासाठी दोन वेळा आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन केले. प्रत्येक वेळी सरकारने जमिन वाटप लवकरात लवकर करू असे आश्वासन दिले सरते शेवटी विधान परिषद आमदार सचिन अहीर यांनी या बाबत सभागृहात लक्षवेधी लावली या लक्षवेधीला मुख्यमंत्री यांनी सकारात्मक उत्तर दिले…
तरीही भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनीचे वाटप होत नाही…फक्त कागदी घोडे नाचवले जात आहेत.
या बाबत भामा-आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकरी पुन्हा एकदा २२ मे पासुन आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन चालू करणार आहेत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वेळ प्रसंगी पिंपरी-चिंचवड शहराला पाणी वाहून नेणार्या पाईप लाईनचे काम बंद पाडण्यात येईल… हि वेळ सरकारने आमच्यावर आणू नये.
भामा-आसखेड चे पाणी सरकारने कोणाला ही द्यावे त्याला आमचा विरोध नाही पण आमचे पुनर्वसन तरी करा… गेली दोन दशके हा प्रकल्पग्रस्त शेतकरी शासन दरबारी हेलपाटे मारत आहे.
दिनांक २२ मे पासुन आझाद मैदान मुंबई बेमुदत धरणे आंदोलनात शंकर साबळे ,सुभाष तळेकर ,काळूराम गडदे, रावजी मोहन सह प्रकल्पग्रस्त शेतकरी सहभागी होतील असा इशारा सुभाष तळेकर भामा-आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकरी यांनी दिला.
- लोणावळ्यातील दाऊदी बोहरा समाजाने सर्व केला मिलाद-उन-नबी (SA) साजरा
- वातावरणातील बदलानुसार भात पिकावरील कीड रोग व्यवस्थापन करा
- जपान आस्थापन सदस्यांची चैतन्य इंटरनॅशनल स्कूलला सदिच्छा भेट
- कार्ल्यात रंगला लेकी मागण्याचा पारंपरिक खेळ
- कार्ला परिसरात गौरी व गणरायाला भावपूर्ण निरोप गणपती बप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या जयघोष