तळेगाव दाभाडे:
किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणात माजी नगरसेवक चंद्रभान खळदे यांचा मुलगा गौरव खळदे याला पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा अटक केली आहे.

आवारे यांच्या हत्येचा तो मुख्य सुत्रधार असल्याचे समोर आले आहे. हत्या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी ही कबुली दिली आहे. काही महिन्यांपूर्वी जून्या नगरपरिषद परिसरात भानू खळदे आणि किशोर आवारे यांच्यात खडाजंगी झाली होती. तेव्हा आवारे यांनी भानू खळदे यांच्या कानशिलात लगावली होती. त्याचाच राग मनात ठेवून भानू खळदे यांचा मुलगा गौरवने बदला घेण्याचे ठरवले.

त्यानुसार नगरपरिषद कार्यालयातच किशोर आवारे यांची क्रूर पद्धतीने हत्या केली. त्यानंतर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडे कसून चौकशी केली, तेव्हा त्यांनी गौरव खळदेच्या सांगण्यावरून हत्या केल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांकडून देण्यात आली आहे.

आवारे यांच्या कुटुंबियांकडून राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्या सह त्यांच्या भावावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात सुनील शेळके यांनी काल माध्यमांसमोर आपली बाजू मांडली होती. आपला या हत्येशी काही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच त्यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांचा तीव्र शब्दांत निषेध केला.

मात्र, पोलिसांनी केलेल्या कामगिरीमुळे अवघ्या काही तासांत पोलिसांनी हत्येतील मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात यश मिळवले आहे. या घटनेतील आरोपींनी याची पोलिसांकडे कबुली दिल्याने मुख्य सूत्रधार सापडला आहे. गौरव खळदे हा या प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आलं आहे.

error: Content is protected !!