गहुंजे:
अवघ्या एक महिन्यापूर्वी लग्न झालेल्या जावयाचा सासरवाडीत अज्ञातांनी खून केला. ही घटना रविवारी (दि. 4) मावळ तालुक्यातील गहुंजे येथे घडली. सूरज काळभोर (रा. आकुर्डी) असे खून झालेल्या जावयाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज काळभोर यांचा महिनाभरापूर्वी गहुंजे येथील संतोष बोडके यांच्या मुलीशी मोठ्या धुमधडाक्यात विवाह झाला. दरम्यान, रविवारी दुपारी सागर पत्नीला घेऊन सासऱ्यांचा शेतात फेरफटका मारत होते.
त्यावेळी तीन ते चार जणांची सागर यांना गाठले. आरोपींनी त्यांच्यावर कोयत्याने वार करून निर्घृण खून केला. हा प्रकार लूटमार करण्याचा उद्देशाने केल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.
- इंदोरीच्या चैतन्य इंटरनॅशनल स्कूलची विज्ञान आश्रमात शैक्षणिक सहल
- शिरगावात दहा फुटी अजगराला जीवदान:वन्यजीव रक्षक संस्थेचा पुढाकार
- टाटा उद्योगसमूह राष्ट्रप्रेमी: पद्मश्री पोपटराव पवार
- माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा :रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेत भरला पुन्हा वर्ग
- नाणोली तर्फे चाकण येथे रक्तदान शिबीराचे आयोजन